Oscar 2023 Entry : आरआरआर, काश्मीर फाईल्सला पछाडत ‘या’ गुजराती चित्रपटाची ऑस्करवारी | पुढारी

Oscar 2023 Entry : आरआरआर, काश्मीर फाईल्सला पछाडत ‘या’ गुजराती चित्रपटाची ऑस्करवारी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूडसाठी यंदाचे साल चांगलेच बोचरे ठरले आहे. बॉलिवूडचा येणार प्रत्येक चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटत आहे. त्यात साऊथच्या आरआरआर, पुष्पा आणि केजीएफच्या चित्रपटांनी गल्ला करुन बॉलिवूडला आणखी खोल खड्ड्यात ढकलण्यासारख काम केलं. त्यामध्ये काश्मीर फाईल्स आणि सध्या प्रदर्शित झालेल्या ब्रह्मास्त्रने काही प्रमाणात आशा तेवत ठेवल्या. या सर्वात ऑस्करसाठी काश्मीर फाईल्स आणि आरआरआर हा चित्रपट भारतातून पाठवला जाईल अशी अपेक्षा सर्वजणच ठेवत होते. पण, इथे देखिल एक सुखद धक्का सर्वांनाच मिळाला. कारण, काश्मीर फाईल्स आणि आरआरआरला धोबीपछाड देत चक्क एक गुजराती चित्रपट भारताकडून ऑस्करला (Oscar 2023 Entry) पाठवला जाणार आहे. यामुळे पुन्हा एकदा सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत.

काश्मीर फाईल्स आणि आरआरआर या पैकी एक चित्रपट ऑस्करला जाईल असे वाटत असताना फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या समितीने गुजराती चित्रपट ‘छेल्लो शो’ या चित्रपटाची ऑस्करमध्ये पाठविण्यासाठी निवड केली. ऑस्करमध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फिचर सिनेमा या विभागासाठी ‘छेल्लो शो’ या चित्रपटाची भारताकडून निवड करण्यात आली.

‘छेल्लो शो’ (Oscar 2023 Entry) चा अर्थ शेवटचा खेळ (The Last Show) असा अर्थ होता. पान नलिन यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. चित्रपटाची आवड आणि वेड असणाऱ्या एका लहान मुलाची ही गोष्ट आहे. त्याला देखिल सिनेमा बनविण्याचा ध्यास चढलेला असतो. त्याचे वेड पूर्ण करण्यासाठी तो गावाकडून शहरात येतो. शहरात तो एका चित्रपट गृहातील प्रोजक्टरवर काम मिळवतो. या ठिकाणी त्याला अनेक चित्रपट पाहण्याची संधी मिळते व येथून तो आपल्या स्वप्नांना पुढे घेऊन जातो. या चित्रपटात भाविन रबारी, भावेश श्रीमाली, ऋचा मीणा, दीपेन रावल और परेश मेहता या कलाकारांनी काम केले आहे.

ऑस्कर आणि जागतिक चित्रपट समीक्षक आणि रसिकांवर छेल्लो शो काय प्रभाव टाकतो हे येणारा काळ ठरवेल. पण, मोठ मोठ्या बॅनरच्या आणि बीग बजेटच्या चित्रपटांना मागे सारत एका प्रादेशिक चित्रपटाने ऑस्करला (Oscar 2023 Entry) जाण्याची किमया साधली आहे.


अधिक वाचा :

Back to top button