Indian Trapped : थायलंडमधील ३०० भारतीय तरूणांचा जीव धोक्यात! आयटी कंपनीतील नोकरीच्या अमिषाला पडले बळी | पुढारी

Indian Trapped : थायलंडमधील ३०० भारतीय तरूणांचा जीव धोक्यात! आयटी कंपनीतील नोकरीच्या अमिषाला पडले बळी

पुढारी ऑनलाईन डेस्क : थायलंडमध्ये नोकरीचे आश्वासन देणाऱ्या आंतरराष्ट्रीय रॅकेटला भारतीय तरूण बळी पडल्याचे उघडकीस आले आहे. (Indian Trapped) म्यानमारच्या म्यॅवॉडी भागात 300 हून अधिक भारतीय अडकल्याची व्हिडिओद्वारे ही माहिती समोर आली आहे. या तरूणांना नोकरीचे अमिष दाखवून बेकायदेशीर कामे करण्यास भाग पाडत असल्याचे सांगण्यात आले आहे. यामध्ये जवळपास ६० तरूण हे तमिळनाडूतील आहेत.

एक अंतरराष्ट्रीय रॅकेटच्या रडारवर असणारी टोळी आयटी क्षेत्रात नोकरी देतो असे सांगून रूजू करून घेत होती. त्यानंतर सायबर क्राईम सारखे गुन्हे करण्यास भाग पाडत असल्याची माहिती समोर आली. नोकरी देणारी ही बनावट कंपनी सायबर क्राईम या गुन्हेगारातील मोठी टोळी आहे. वेगवेगळ्या देशांमध्ये यांचे जाळे पसरलेले आहे, त्यामार्फत हे सायबर क्राईम रॅकेट चालवले जाते. म्यॅवॉडी हे म्यानमारमधील ठिकाण या टोळीचे प्रमुख केंद्र आहे. हा संपूर्ण भाग एका सशस्त्र गटाच्या वर्चस्वाखाली असल्याने म्यानमार सरकारच्या ताब्यात येत नाही. ही टोळी नोकरीचे अमिष दाखवून अपहरण करून कुटुंबियांशी संपर्क साधून अपहरणकर्त्याची माहिती देत त्याचा ‘मलेशियन चायनीज’ असा उल्लेख करतात. (Indian Trapped)

काही तमिळ तरूणांनी शनिवारी पाठविलेल्या एका व्हिडिओमुळे हे प्रकरण उघडकीस आले. यामध्ये त्यांनी त्यांची सुटका करावी अशी मागणी केंद्र आणि तामिळनाडू सरकारकडे केली. तसेच यामध्ये ते पुढे असेही म्हणतात की, त्यांची नियुक्ती करणारे वरिष्ठ लोक त्यांना दिवसातील १५ तासांपेक्षा जास्त काम करण्यास भाग पाडत आहेत. बेकायदेशीर काम करण्यास नकार दिल्यास त्यांना मारहाण करून विजेचे झटके दिले जात आहेत, असेही त्यांनी सांगितले. यांगून, म्यानमार येथील भारतीय दूतावासाने ५ जुलै रोजी ‘नोकऱ्या देणार्‍या अनैतिक घटकां’ विरुद्ध सावधगिरीचा सल्ला जारी केला आहे.

संबंधित बातम्या

सोमवारी, कराईकलमेडू येथील मच्छिमार राजा सुब्रमण्यम (वय ६०) यांनी पुद्दुचेरी केंद्रशासित प्रदेशातील कराईकलच्या जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मुलाला वाचवण्याची अपील केली. तो म्यानमारमध्ये राहणारा भारतीय नागरिकांपैकी एक आहे. सुब्रमण्यम याचा मोठा मुलगा सुधाकर याने त्यांच्या भावाची गोष्ट सांगितली, जो पूर्वी दुबईमध्ये डेटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून काम करत होता. या वर्षाच्या सुरुवातीला त्याच्या व्यवस्थापकाने त्याला बढती मिळाल्याचे सांगितले आणि त्याला त्याच्या थायलंड कार्यालयात जाण्यास सांगितले. त्याला आणि इतर अनेकांना थायलंडमधून बेकायदेशीरपणे म्यानमारला नेण्यात आले.

सुधाकरने  दिलेल्या अधिक माहितीनूसार, काही दिवसांपूर्वी त्याच्या मालकांनी त्याच्या सहकाऱ्याला बेकायदेशीर काम करण्यास नकार दिल्याने मारहाण केली होती. यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याला पाच टाके पडले आहेत.

हेही वाचा

 

Back to top button