वेगळ्या विदर्भाच्या रणनितीसाठी प्रशांत किशोर राजकीय मैदानात; लवकरच धोरण आखणार | पुढारी

वेगळ्या विदर्भाच्या रणनितीसाठी प्रशांत किशोर राजकीय मैदानात; लवकरच धोरण आखणार

नागपूर; पुढारी वृत्तसेवा: स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी आता प्रशांत किशोर यांनी रणांगणात उडी घेतली आहे. राजकीय धोरणकर्ते प्रशांत किशोर यांनी मंगळवारपासून आपल्या मिशन विदर्भला नागपुरात प्रारंभ केला. प्रशांत किशोर यांनी मंगळवारी दिवसभर कार्यकर्ते, विचारवंत, संघटना यांच्यासोबत बैठका घेऊन त्यांची मते जाणून घेतली.

प्रशांत किशोर यांच्या २० जणांच्या टिमने काही महिन्यांपूर्वी संपूर्ण विदर्भात फिरून शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आदी वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांशी संपर्क साधून त्यांची मते जाणून घेतली होती. त्यानंतर मंगळवारी (दि. २०) रोजी नागपुरात बैठक घेतली. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना प्रशांत किशोर यांनी दहा खासदार असलेले विदर्भाचे राज्य लहान नाही तर मोठे आहे असे त्यांनी सांगितले. तर विदर्भाची चळवळ उभारायची, की राजकीय पक्ष स्थापन करायचा याचा निर्णय येथील लोकांनाच घ्यायचा आहे असेही ते म्हणाले. वेगळ्या विदर्भ राज्याच्या या बैठकीला प्रशांत किशोर यांनी मिशन ३० हे नाव दिले आहे.

केवळ छोट्या राज्याची निर्मिती आणि त्यामुळे होणारे फायदे- तोटे एवढ्या मर्यादित उद्देशाने वेगळ्या विदर्भाच्या मागणीकडे पाहता येणार नाही. विदर्भाचा एक समृद्ध वारसा आहे. एक भौगोलिक, सामाजिक, आर्थिक स्थिती आहे. हे सर्व मुद्दे समजून घेतल्यानंतर अधिक काही सांगता येईल. वेगळ्या विदर्भाबाबत येथील लोकांच्या काय भावना आहेत?, त्यांचे नेमके काय विचार आणि सूचना आहेत?, आतापर्यत कोणते प्रयत्न झाले? या सर्व प्रश्नाची उकळ करून घ्यायला आलो आहे. महाराष्ट्रातील वेगळ्या विदर्भाची मागणी मागच्या सहा दशकांपासून आहे. त्या लढ्याला बळकटी देण्यासाठी आलो आहे. सर्वांशी बोलून समजून घेतल्याशिवाय काही बोलणे घाईचे होईल, असे ते म्हणाले.

एकेकाळी विदर्भवीर जाम्बुवंतराव धोटे यांच्या नेतृत्वात वेगळ्या विदर्भाचा लढा चांगलाच पेटला होता. मात्र, धोटेंनंतर तेवढा तीव्र लढा उभारणारे नेतृत्व तयार झाले नाही. त्यानंतर विदर्भवादीही एकत्रित राहिले नाहीत. रिपब्लिकन पक्षासारखी विदर्भवादी संघटनांही होवू शकले झाली. कालांतराने हा लढा संपत गेला. २०१९ मध्ये स्वतंत्र विदर्भ राज्याचा मुद्दा घेऊन विदर्भ निर्माण महामंच लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरला होता. विविध विदर्भवादी पक्ष व संघटनांनी एकत्रित येऊन हा महामंच स्थापन केला होता.

विदर्भ निर्माण महामंचामध्ये विदर्भ राज्य आंदोलन समिती, विदर्भ राज्य आघाडी, आम आदमी पार्टी, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी (बीआरएसपी), विदर्भ माझा, शेतकरी संघटना, लोकजागर पार्टी, जनसुराज्य पार्टी, लोक जागर पार्टी, रिपाइं (खोरिप) आणि प्रॉवटिस्ट ब्लॉक ऑफ इंडिया यांचा समावेश होता. असे त्यांनी यावेळी सांगितले आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button