निया शर्मा गाळते जिममध्ये घाम… | पुढारी

निया शर्मा गाळते जिममध्ये घाम...

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन: ड्रेसिंग सेन्ससोबतच निया शर्मा ही अभिनेत्री परफेक्ट फिगरसाठी प्रसिद्ध आहे. मात्र, फिगर मेंटेन करण्यासाठी ती जिममध्ये प्रचंड घाम गाळते. नियाने यासंबंधीचा एक व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये ती अत्यंत कठीण एक्सरसाईज करताना दिसते.

या व्हिडीओत निया शर्मा आपले डोके जमिनीवर टेकवून पाय वर करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. यामध्ये ती यशस्वी होते आणि काही वेळ याच पोझिशनमध्ये राहण्याचा प्रयत्न करते.

यातून असे सिद्ध होते की, ही अभिनेत्री आपली फिगर मेंटेन करण्यासाठी व शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी चांगलाच घाम गाळते. व्हिडीओ शेअर करताना नियाने कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, ही तर केवळ सुरुवात आहे. मी अल्ट्रा प्रो लेव्हलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button