गडहिंग्लज : तुफान गर्दीत ‘पुढारी शॉपिंग-फूड फेस्टिव्हल’चा प्रारंभ | पुढारी

गडहिंग्लज : तुफान गर्दीत ‘पुढारी शॉपिंग-फूड फेस्टिव्हल’चा प्रारंभ

गडहिंग्लज : पुढारी वृत्तसेवा

विस्तीर्ण अशा शिवराज महाविद्यालयाच्या मैदानावर वाहनेच वाहने… अन् लोकांची प्रचंड गर्दी फुलून आली. गडहिंग्लजला दै. ‘पुढारी’ शॉपिंग अँड फूड फेस्टिव्हलच्या निमित्ताने जणू जत्राच भरल्याचे पहावयास मिळाले. शॉपिंग आणि फूड फेस्टिव्हलच्या पहिल्याच दिवशी लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिल्याने तुफान गर्दीतच फेस्टिव्हलचा दिमाखात प्रारंभ झाला. सायंकाळी कलर्स मराठीवरील ‘जीव माझा गुंतला’ फेम मल्हार अन् अंतरा या जोडीने उपस्थितांची मने जिंकली.

सायंकाळी सहा वाजता प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांच्या हस्ते फीत कापून फेस्टिव्हलचे उद्घाटन झाले. दीपप्रज्वलन शिवराज संकुलाचे सचिव प्रा. डॉ. अनिल कुराडे, तहसीलदार दिनेश पारगे, मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर, पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके, ‘शिवराज’चे उपाध्यक्ष अ‍ॅड. दिग्विजय कुराडे यांच्या हस्ते झाले. स्वागत विभागीय प्रतिनिधी प्रवीण आजगेकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. शिवाजी पाटील यांनी केले. डी मेकर गु—पच्या वतीने नृत्याविष्काराचे सादरीकरण झाले.

लक्झरी कार, अत्याधुनिक दुचाकी, विविध शिक्षण संस्था, घरगुती उपयोगाच्या वस्तू यासह बच्चे कंपनीसाठी सर्वात मोठा अ‍ॅम्युझमेंट पार्क या फेस्टिव्हलमध्ये उभारल्याने या ठिकाणी लोकांची तोबा गर्दी झाली होती. उद्घाटनापूर्वीच अनेकांची पावले या फेस्टिव्हलकडे वळल्याने जिकडे तिकडे गर्दीच गर्दी दिसून येत होती. फुड्स फेस्टिव्हलमध्ये अनेक दर्जेदार पदार्थ उपलब्ध असल्याने याचाही पुरेपूर आस्वाद लोकांनी घेतला.

या फेस्टिव्हलचे मुख्य प्रायोजक अर्जुन ऑईल हे आहेत. शिवराज कॉलेज मैदान, शासकीय विश्रामगृहाशेजारी, कडगाव रोड गडहिंग्लज येथे दि. 29 मार्चपर्यंत सकाळी 10 ते रात्री 9 पर्यंत हा फेस्टिव्हल सुरू राहणार आहे. दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था आहे.

आज रॉकिंग हिट्स बीट्स….

फेस्टिव्हलमध्ये आलेल्या ग्राहकांचे निखळ मनोरंजन व्हावे यासाठी आज (दि.26) प्रल्हाद-विक्रम प्रस्तूत रॉकिंग हिट्स बीट्स हा उत्कृष्ट गीतांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. याशिवाय दिवसभरात विविध मान्यवरही स्टॉल्सना भेटी देणार आहेत.

Back to top button