‘रनवे 34’ : अजय देवगण बनला ‘पायलट’ | पुढारी

‘रनवे 34’ : अजय देवगण बनला 'पायलट'

नवी दिल्ली : लोकप्रिय अभिनेता अजय देवगण सध्या आपल्या आगामी ‘रनवे 34’ या चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी सलमान खानने या चित्रपटाचा ‘टिझर’ शेअर केला होता. त्यानंतर चाहत्यांना या चित्रपटाच्या ट्रेलरची प्रतीक्षा लागून राहिली आहे. लवकरच चित्रपटाचा ट्रेलरही रीलिज होणार आहे.

दरम्यान, अजय देवगणने या चित्रपटाचा एक नवा प्रोमो शेअर केला असून तो चांगलाच दमदार आहे. हा प्रोमो काहीच सेकंदांचा असून यामध्ये अजय देवगण पायलटच्या भूमिकेत असून तो खराब हवामानातून आपल्या फ्लाईटला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे.

उल्लेखनीय म्हणजे या प्रोमोत बिग बी अमिताभ बच्चन यांचीही एक झलक दाखविण्यात आली आहे. यामध्ये बिग बी यांचा चेहरा अत्यंत गंभीर असल्याचे दिसत आहे. अजय देवगणला ‘रनवे 34’ कडून यशाची अपेक्षा आहे.

हेही वाचलत का ?

Back to top button