अभिनेत्री झेंडाया : डेटिंगनंतर आता घेतले ३० कोटींचे घर | पुढारी

अभिनेत्री झेंडाया : डेटिंगनंतर आता घेतले ३० कोटींचे घर

पुढारी ऑनलाईन डेस्क

मार्व्हलच्या अलीकडच्या ‘स्पायडर मॅन’ चित्रपटांतील मुख्य कलाकार टॉम हॉलँड आणि अभिनेत्री झेंडाया सध्या एकमेकांना डेट करत आहेत. ‘स्पायडर मॅन’मधील दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप भावली होती. आता दोघांनी त्यांचे नाते पुढच्या टप्प्यावर नेले आहे.

या दोघांनी मिळून ब्रिटनमध्ये एक आलिशान बंगला खरेदी केल्याची माहिती आहे. या बंगल्याची किंमत ३० कोटी रुपये असून त्यात आता दोघे मिळून २.५ कोटी रुपयांचे रिनोवेशन करणार आहेत. या बंगल्यात थिएटर, जिम आणि इतरही सुविधा आहेत. टॉम मूळचा इंग्लंडचा आहे. तर झेंडाया लॉस एंजल्समध्ये राहत होती.

Back to top button