पुढारी ऑनलाईन डेस्क
IPL Auction : इंडियन प्रिमियर लीग (आयपीएल) २०२२ साठी खेळाडूंवर लागणाऱ्या बोलीवर क्रिकेट रसिकांचे लक्ष आहे. जगभरातील क्रिकेट खेळाडूंची आणि क्रिकेटची आवड असणाऱ्या लोकांची या बोलीवर नजर असते. कोणत्या खेळाडूवर किती रूपयांची बोली लागली हे सर्वांना जाणून घेण्याची उत्सुकता असते. आयपीएल २०२२ च्या या हंगामाच्या अगोदर खेळाडूंचा हा मोठा लिलाव असेल, हा लिलाव १२ आणि १३ फेब्रुवारीला बंगळूरमध्ये होईल. यामध्ये फक्त त्या खेळाडूंचा समावेश असेल ज्यांना आठ संघांनी रिटेन केले आहे आणि बरोबरच दोन नवे संघ या वर्षी पदार्पण करत आहेत. या संघांनी घेतलेल्या खेळाडूंचीदेखील बोली लागणार नाही. याच्या व्यतिरिक्त सर्व खेळाडूंवर बोली लागेल, हा आयपीएलचा मेगा ऑक्शन असणार आहे. (IPL संघ)
१२१४ खेळाडूंनी स्वतःचे नाव या मेगा ऑक्शन मध्ये दिले होते. या मध्ये ८९६ भारतीय खेळाडू आहेत तर ३१८ विदेशी खेळाडूंचा समावेश आहे. या मेगा ऑक्शन मध्ये ५९० खेळाडूंवर बोली लागणार आहे. यामध्ये ३७० भारतीय खेळाडू असणार आहेत तर २२० विदेशी खेळाडूंचा समावेश आहे. २०२२ च्या आयपीयलच्या या हंगामात दोन नव्या संघाचा समावेश होणार आहे. आयपीयल २०२२ च्या या हंगामात अहमदाबाद आणि लखनौच्या संघांचा समावेश होईल. हे दोन संघ या वर्षीच्या पदापर्णाच्या वर्षात कसे पदार्पण करतील याकडे सर्वांचे लक्ष्य आहे. यामध्ये १७ खेळाडूंची बाईस प्राईस ही २ कोटी रूपये आहे. शिवाय १.५ कोटी रूपये बेस प्राईस असणारे २० खेळाडू या ऑक्शनमध्ये आहेत. तर १ कोटी रूपये बेस प्राईस असणाऱ्या ३४ खेळाडूंचा या ऑक्शन मध्ये समावेश आहे. जुन्या आठ असणाऱ्या संघांनी कोणत्या खेळाडूंना रिटेन केले आहेत आणि दोन नव्या संघांनी बोली लागण्या अगोदर संघात घेतले आहे? हे पाहूयात (IPL संघ)
लखनौ टीममध्ये समावेश असलेले खेळाडू – केएल राहूल (१७ कोटी), मार्कस स्टोईनिस (९.२ कोटी), रवी बिश्नोई (४ कोटी). तीन खेळाडूंचा लखनौच्या संघात समावेश आहे. अहमदाबादच्या संघात समावेश असलेले खेळाडू- हार्दिक पंड्या (१५ कोटी), राशिद खान (१५ कोटी) शुभमन गिल (८ कोटी). या खेळाडूंचा अहमदाबादच्या संघात समावेश आहे. (IPL संघ)
प्रत्येक संघाकडे ९० कोटींचे बजेट असते. फ्रेंचाईज संघ रिटेन करणाऱ्या खेळाडूंच्या बदल्यात ४२ कोटी रूपये घेते. तीन खेळाडू रिटेन केले तर ३३ कोटी रूपये घेतले जातात. तर दोन खेळाडू रिटेन केले असल्यास २४ कोटी रूपये आणि एक खेळाडू रिटेन केला असेल तर १४ कोटी रुपये त्या संघाच्या पर्स मधून फ्रेंचाईज कट करते. तर अनकॅप्ड खेळाडू रिटेन केला तर ४ कोटी रुपये पर्समधून कमी केले जातात. प्रत्येक टीम जास्तीत जास्त चार खेळाडूंना रिटेन करू शकते. (IPL संघ)
सध्या दिल्ली कॅपिटल्स या संघाकडे ४७.५ कोटी रूपये आहेत. ज्यामध्ये त्यांनी तीन खेळाडू अदोगरच रिटेन केले आहेत. यामागे कारण हेच की दिल्लीने चैाथा खेळाडू अॅनरिक नाॅर्खियाला ६.५० कोटी रूपये दिले आहेत.
चेन्नई सुपर किंग्स- रविंद्र जडेजा (१६ कोटी रूपये), महेंद्र सिंह धोनी (१२ कोटी), मोईन अली (८ कोटी), ऋतूराज गायकवाड (६ कोटी रूपये) तर चेन्नईच्या पर्समधून ४२ कोटी खर्च झाले आहेत तर ४८ कोटी रूपये शिल्लक आहेत.
मुंबई इंडियन्स – रोहीत शर्मा (१६ कोटी रुपये), जसप्रीत बुमराह (१२ कोटी रूपये), सुर्यकुमार यादव ( ८ कोटी रूपये), कायरन पोलार्ड (६ कोटी रुपये). मुंबईच्या इंडियन्सच्या पर्समधून ४२ कोटी खर्च झाले आहेत तर ४८ कोटी रुपये शिल्लक आहेत.
कोलकाता नाईट राइडर्स – आंद्रे रसेल (१२ कोटी रूपये) याला रिटेन केल्याने पर्समधून १६ कोटीकट झाले. वरूण चक्रवर्ती (८ कोटी), व्यंकटेश अय्यर (८कोटी), सुनिल नरेन (६ कोटी रुपये). सध्या कोलकता नाईट राइडर्सकडे ४८ कोटी शिल्लक आहेत.
आरसीबी – विराट कोहली (१५ कोटी), ग्लेन मॅक्सवेल (११ कोटी), मोहम्मद सिराज (७ कोटी) आरसिबीच्या पर्समध्ये ५७ कोटी रूपये शिल्लक आहेत.
पंजाब किंग्स – मयांक अग्रवाल (१२ कोटी), अर्शदीप सिंह (४ कोटी रूपये). पंजाब किंग्सच्या पर्समध्ये ७२ कोटी रूपये शिल्लक आहेत.
दिल्ली कॅपिटल्स – ऋषभ पंत (१६ कोटी), अक्षर पटेल (९ कोटी रूपये), पृथ्वी शॉ (७.५ कोटी). तर दिल्ली कॅपिटल्सच्या पर्समध्ये ४७.५० कोटी शिल्लक आहेत.
राजस्थान रॉयल्स- संजू सॅमसन (१४ कोटी), जॉस बटलर (१० कोटी) आणि यशस्वी जयस्वाल (४ कोटी) तर राजस्थान रॉयल्सच्या पर्समध्ये ६२ कोटी शिल्लक आहेत.
सनराईजर्स हैदराबाद- केन विलियमसन (१४ कोटी), अब्दुल समद (४ कोटी) उमरान मलिक (४ कोटी रूपये). तर सनराईजर्स हैदराबादच्या पर्समध्ये ६८ कोटी रूपये शिल्लक आहेत. कोणती टीम यानंतर तगडी होईल हे या मेगा ऑक्शननंतरच ठरेल. (IPL संघ)
हेही वाचलत का?