Lok Sabha Election Tamil Nadu: DMK नेते उदयनिधी स्टॅलिन यांचे तामिळनाडूत जोरदार शक्तीप्रदर्शन | पुढारी

Lok Sabha Election Tamil Nadu: DMK नेते उदयनिधी स्टॅलिन यांचे तामिळनाडूत जोरदार शक्तीप्रदर्शन

पुढारी ऑनलाईन डेस्क: देशभरात लोकसभा रणधुमाळीला सुरूवात झाली आहे. अनेक पक्ष श्रेष्ठींनी त्यांच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. दरम्यान अनेक नेत्यांकडून शक्तीप्रदर्शन करत, पक्षाला मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे. तामिळनाडूमध्येसुद्धा हे वातावरण पाहायला मिळत आहे. यावेळी सत्ताधारी DMK (द्रविड मुन्नेत्र कळघम्) पक्षाचे नेते क्रीडा मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी आज (दि.२६) जोरदार शक्तीप्रदर्शन केले आहे. (Lok Sabha Election Tamil Nadu)

मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी लोकसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर तामिळनाडूमधील तिरुवनमलाई जिल्ह्यात प्रचाराला सुरूवात केली. यावेळी स्टॅलिन यांनी तामिळनाडूतील जनतेला भावनिक आव्हान केले आहे. ते म्हणाले, ३ जून रोजी तामिळनाडूचे दिवंगत राजकारणी आणि माजी मुख्यमंत्री एम करुणानिधी यांची 100 वी जयंती आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीची मतमोजणी आहे. त्यामुळे तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमधील सर्व ४० जागा जिंकून आपण डीएमकेला भेट द्यायला हवी” असे आवाहन DMK नेते उदयनिधी यांनी जनतेला केले आहे. (Lok Sabha Election Tamil Nadu)

उदयनिधी हे तमिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच सुपुत्र आहेत. तसेच तमिळ सिनेसृष्टीत अभिनेते म्हणूनही त्यांची ओळख आहे. मध्यंतरी ते सनातन धर्म आणि भाजपवर केलेल्या  वादग्रस्त टीपण्णीमुळे चर्चेत आले होते. (Lok Sabha Election Tamil Nadu)

हेही  वाचा:

Back to top button