MNS Vs BJP: विरोधी आवाज सत्ताधाऱ्यांना सहन होत नाही : ‘मनसे’चा सरकारवर निशाणा | पुढारी

MNS Vs BJP: विरोधी आवाज सत्ताधाऱ्यांना सहन होत नाही : 'मनसे'चा सरकारवर निशाणा

पुढारी ऑनलाईन डेस्क: भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त मनसेने आज (दि.२५) एक व्हिडिओ त्यांच्या ‘X’ अकाऊंटवरून शेअर केला आहे. या सोबत शेअर केलेल्या पोस्टमध्ये मनसेने राज्य आणि केंद्रातील सत्ताधारी भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. (MNS Vs BJP)

MNS Vs BJP: हिंदुस्थानचं राजकारण कधीच सूडबुद्धीने पेटलं नव्हतं- मनसे

अटलबिहारी वाजपेयी यांचा संसद सभागृहातील बोलतानाचा व्हिडिओ आणि संदेश मनसेने शेअर करत, सत्ताधारी भाजपला लक्ष्य केले आहे. मनसेने म्हटले आहे की, सत्ताधीश कुणीही असो; पण आजमितीला किंचितही विरोधी आवाज सत्ताधाऱ्यांना सहन होत नाही. पण “हि #अटलवाणी ऐकलीत तर कळेल कि, हिंदुस्थानचं राजकारण कधीच राजकीय सूडबुद्धीने पेटलेलं नव्हतं पण आज……………” असे  ट्विट मनसेने केले आहे. (MNS Vs BJP)

पुन्हा ह्या देशात लोकशाही बळकट होवो

राजकीय कारकिर्दीचा मोठा काळ विरोधात असतानाही सत्तेच्या मोहापायी संयम न सोडणाऱ्या अटलजींच्या जयंतीला इतकीच प्रार्थना की, पुन्हा ह्या देशात विचारांचं, विवेकाचं, तात्विक विरोधाचं राजकारण रुजो, लोकशाही खऱ्या अर्थाने बळकट होवो, अशी प्रार्थना मनसेने आज अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त केली आहे. (MNS Vs BJP)

हेही वाचा:

Back to top button