Food poisoning in Gwalior : मध्य प्रदेशातील ग्‍वाल्‍हेरमध्ये LNIPE च्या १०० विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा | पुढारी

Food poisoning in Gwalior : मध्य प्रदेशातील ग्‍वाल्‍हेरमध्ये LNIPE च्या १०० विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा

ग्‍वाल्‍हेर ; पुढारी ऑनलाईन मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेर येथील LNIPE (लक्ष्मीबाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल एज्युकेशन) या देशातील प्रतिष्ठित क्रीडा संस्थांपैकी एक असलेल्या संस्‍थेत १०० हून अधिक विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली. ही घटना  मंगळवारी घडली.

संस्थेच्या व्यवस्थापनाने प्रथम एलएनआयपीमध्ये उपचार देण्याचा प्रयत्न केला, परंतु विद्यार्थ्यांची प्रकृती नियंत्रणाबाहेर गेल्याने त्यांना घाईघाईने रात्री ९ वाजण्याच्या सुमारास जयआरोग्य रुग्णालयाच्या नवीन इमारतीत दाखल करावे लागले. रात्री उशिरापर्यंत 125 हून अधिक विद्यार्थ्यांना या ठिकाणी दाखल करण्यात आले होते.

विद्यार्थी आजारी पडण्याबाबत एलएनआयपी व्यवस्थापनाने मौन बाळगले. आजारी विद्यार्थ्यांना उपचार देणाऱ्या डॉ.सुषमा त्रिखा आणि डॉ.विजय गर्ग यांनी सांगितले की, दूषित अन्न खाल्ल्याने विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली आहे.

या सर्व विद्यार्थ्यांना उलटी, संडास आणि थंडी तापाची लक्षणे सुरू झाली. यावेळी डॉक्‍टरांनी तात्‍काळ उपचारांना सुरूवात केली. काही विद्याथ्‍यांना सलाईनही लावण्यात आले. विद्यार्थी आजारी पडण्याच्या घटनेवर एलएनआयपी व्यवस्थापनाने मौन बाळगले आहे.


हेही वाचा : 

Back to top button