Isro Aditya L1 launch : आदित्य एल १ सूर्याची कोणती रहस्य उलगडणार? त्याचा भारताला ‘असा’ होईल लाभ? | पुढारी

Isro Aditya L1 launch : आदित्य एल १ सूर्याची कोणती रहस्य उलगडणार? त्याचा भारताला 'असा' होईल लाभ?

What will ISRO study in Aditya-L1 mission | भारतच नव्हे तर जगासाठी महत्त्वाची मोहीम

पुढारी ऑनलाईन नॅशनल डेस्क

चांद्रयान ३च्या यशानंतर इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन ( Indian Space Research Organisation, ISRO) आता सूर्यावर मोहिमेसाठी सज्ज होत आहे. आदित्य L1 (Aditya L1 Mission) या मोहिमेचे प्रक्षेपण शनिवारी (२ सप्टेंबर) सकाळी होणार आहे. सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये असलेल्या लॅगरेंज पॉईंटला पोहोचण्यासाठी या स्पेसक्राफ्टला १२५ दिवस लागणार आहेत. या मोहिमेची उद्दिष्टं काय आहेत, आणि याला भारताला कसा फायदा होईल, हे या लेखातून जाणून घेऊया. (ISRO study in Aditya-L1 mission)

श्रीहरीकोट येथील सतीश धवन स्पेस सेंटर येथून PSLV-XLने हे मिशन उड्डाण घेईल. पृथ्वी आणि सूर्य यांच्या मध्ये असलेल्या लॅगर पॉईंट १ येथे हे स्पेसक्राफ्ट स्थिरावणार आहे.

क्रोमोस्पेअरचा अभ्यास | ISRO study in Aditya-L1 mission

सूर्याचा अगदी वरच्या भागाचा त्याशिवाय क्रोमोस्पेअर, आणि कोरोना यांचा अभ्यास आदित्य एल १ करणार आहे. सूर्याच्या बाह्य वातावरणाला कोरोना असे म्हटले जाते. तर सूर्याचा जो दृश्य भाग आहे, त्याला फोटोस्फेअर (photosphere) म्हटले जाते. फोटोस्पेअर आणि कोरोना (Corona) यांच्यामध्ये प्लाज्माचा थर आहे, याला क्रोमोस्फेअर (chromosphere) म्हटले जाते. याला प्लाज्माचे फिजिक्स, सौर-वादळे, कोरोनल मास इजेक्शन यांचा अभ्यास आदित्य L1 करणार आहे. (ISRO study in Aditya-L1 mission)

या स्पेसक्राफ्टच्या प्लेलोडवर सूर्याच्या पृष्ठभागावरील पार्टिकल (कण) आणि प्लाज्मा वातावरण यांचा नैसर्गिक स्थितीत अभ्यास केला जाणार आहे. सूर्याचा कोरोना भागाचे फिजिक्स आणि हा कोरोना कशा प्रकारे तप्त होतो, हे समजून घेण्यासाठी हा अभ्यास केला जाणार आहे.

पृथ्वीवरील आणि अंतराळातील हवामान | ISRO study in Aditya-L1 mission

कोरोनोल लूपमधील प्लाज्माचा वेग, तापमान, घनता, कोरोनल मास इजेक्शनची निर्मिती कोठे होते, यांचाही सविस्तर अभ्यास होईल.
सूर्याच्या कोरोनाचे चुंबकीय क्षेत्र, अंतराळातील हवामान, सौरवादळांचे स्वरूप यांचा बारकाईने अभ्यास केला जाईल. सूर्यावरील महत्त्वाच्या घडामोडींमध्ये कोरोनल हिटिंग, कोरोनल मास इजेक्शन, सौरवादळे, अंतराळातील हवामान यांचा समावेश होतो, यांच्यावर प्रकाश टाकण्याचे काम आदित्य एल १ करणार आहे.

थोडक्यात काय तर सूर्याबद्दलची मानवाची समज, अभ्यास विस्तृत करण्याचे काम आदित्य एल१ करेल. आदित्य एल १च्या पेलोडवर जो डेटा संकलित केला जाईल, यातून सूर्य आणि त्याचा सूर्यमालेतील ग्रहांवर होणार परिणाम यांची चांगली माहिती मिळणार आहे.
सूर्याचा अभ्यास करण्यासाठी नासाची Solar Dynamics Observatory आणि युरोपियन स्पेस एजन्सीची Solar and Heliospheric Observatory या दोन मोहिमा कार्यरत आहेत. इस्रोची आदित्य एल १ ही मोहीम यांच्या तोडीस तोड असेल.

भारताला असा होईल लाभ | ISRO study in Aditya-L1 mission

या मोहिमेचे वैशिष्ट्यं म्हणजे सूर्याच्या बाह्यभागाचा सूक्ष्मपणे होणारा अभ्यास आणि सूर्याच्या अल्ट्राव्हॉयलेट प्रकाशात मिळवाता येणाऱ्या प्रतिमा हे ठरणार आहे. एकूणच काय तर सूर्याचा पृथ्वीवरील हवामान आणि अंतराळातील हवमान यांच्यावर कसा प्रभाव पडतो, या प्रकाश टाकण्याचे काम आदित्य एल १ करणार आहे, त्याचा मोठा फायदा पर्यावरण आणि तंत्रज्ञान अभ्यासात आणि विकासात होणार आहे.

हेही वाचा

Back to top button