ADITYA-L1 Mission : सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये ‘आदित्य’ स्थिर कसा राहाणार? लॅगरेंज १ आहे तरी काय? What is Lagrange point 1? | पुढारी

ADITYA-L1 Mission : सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये 'आदित्य' स्थिर कसा राहाणार? लॅगरेंज १ आहे तरी काय? What is Lagrange point 1?

What is Lagrange point 1? सौर मोहिमेत L1 हे ठिकाण का महत्त्वाचे?

पुढारी ऑनलाईन, नॅशनल डेस्क

(What is Lagrange point 1?) चांद्रयान ३च्या यशानंतर भारताची स्वारी आता सूर्याच्या दिशेने सुरू होता आहे. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्रोचे आदित्य एल१ मिशनचे (ADITYA-L1 Mission) प्रक्षेपण आज शनिवारी (दि.२) सकाळी ११ वाजून ५० वाजता होत आहे. या निमित्ताने सर्वांना कुतुहूल आहे ते लॅगरेंज १ या पॉईंटचे. सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये स्पेसक्राफ्ट स्थिर ठेवण्याचे मोठे आव्हान इस्रो समोर आहे. इस्रो हे कसे साध्य करणार आणि त्यात लॅगरेंज पॉईंटचे महत्त्व काय आहे हे या लेखातून समजून घेऊ.

प्रक्षेपण झाल्यानंतर स्पेसक्राफ्ट लॅगरेंज पॉईंट १पर्यंत पोहोचण्यासाठी १२५ दिवस लागणार असल्याची माहिती इस्रोने दिली आहे. आदित्य एल १ मिशन लॅगरेंज पॉईंट येथून सूर्याचा अभ्यास करणार आहे. सूर्याचा फोटोस्पेअर, क्रोमोस्पेअर, सूर्याचा सर्वांत बाहेरी भाग याचा अभ्यास आदित्य एल१ करणार आहे. या अभ्यासासाठी आदित्य L1वर सात पेलोड बसवण्यात आले आहेत. हिंदुस्तान टाईम्सने ही बातमी दिली आहे. (What is Lagrange point 1?) (ADITYA-L1 Mission)

लॅगरेंज पॉईंट१ म्हणजे काय? What is Lagrange point 1? ADITYA-L1

पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये एकूण ५ लॅगरेंज पॉईंट आहेत. या पॉईंटवर सूर्य आणि पृथ्वी या दोन्हीतील गुरुत्वाकर्षण एखाद्या लहान वस्तूचे सेंट्रिफ्युगल फोर्स (अपकेंद्री बल) संतुलित ठेवते. त्यामुळे ही लहान वस्तू या सूर्य आणि पृथ्वीच्या अनुषंगाने स्थीर राहाते.
लॅगरेंज पॉईंट १ हा पृथ्वीपासून १.५ दशलक्ष किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. सूर्याची पृथ्वीभोवतीची जी कक्षा आहे, त्यावर हा लॅगरेंज पॉईंट १ आहे.

Lagrange Point 1

सूर्याचा असा होणार अभ्यास? ADITYA-L1 | What is Lagrange point 1?

सूर्याच्या अभ्यासासाठी लॅगरेंज पॉईंट १ हा अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण या पॉईंटवरील कोणतीही वस्तू सूर्य-पृथ्वीच्या अनुषंगाने स्थिर राहाते. सूर्य आणि पृथ्वी यांच्यातील गुरुत्वाकर्षणातील परस्पर संबंधातून ही स्थिरता येते, त्यामुळे वेगवेगळ्या शास्त्रीय संशोधनासाठी हा पॉईंट महत्त्वाचा मानला जातो. यापूर्वी Solar and Heliospheric Observatory याच ठिकाणी आहे. येथून सूर्याच्या दर्शन सातत्याने होत राहाते, पृथ्वीवरील वातावरण, पृथ्वीवरील दिवस आणि रात्रीचे चक्र याचा यावर परिणाम होत नाही. आदित्य L1वरील सातपैकी ४ पेलोड सूर्याच्या दिशेने आहेत, तर ३ पेलोड विविध प्रयोग करतील, त्यामुळे सूर्यमालेतील सूर्याच्या विविध अंगाने शास्त्रीय माहिती मिळणार आहे.

हेही पाहा

Back to top button