दिल्लीत शाळांनतर रुग्णालयांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी

दिल्लीत शाळांनतर रुग्णालयांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : दिल्लीतील शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी दिल्यानंतर आता दोन रुग्णालयांना बॉम्बने धमक्या मिळाल्या आहेत. धमकी देणाऱ्याने धमकीचा ईमेल पाठवला आहे. प्राथमिक माहितीनुसार, धमकीचा ई मेल संजय गांधी हॉस्पिटल आणि बुरारी हॉस्पिटलला मिळाला आहे.

पोलिसांसह अग्निशमन दलाची घटनास्थळी धाव

धमकीचा ई मेल मिळाल्‍यानंतर रुग्‍णालयांच्‍या प्रशासनाने तत्‍काळ तक्रार केली. पोलीस, अग्निशमन विभाग आणि सर्व नागरी यंत्रणांव्यतिरिक्त बॉम्ब आणि श्वान पथक घटनास्थळी धाव घेतली आहे. रुग्णालयात शोधमोहीम सुरू आहे. मात्र, आतापर्यंत रुग्णालय परिसरातून काहीही संशयास्पद आढळून आलेले नाही.

दिल्‍लीतील शाळांनाही मिळाली होती धमकी

1 मे रोजी दिल्‍लीतील 223 शाळांना बॉम्ब पेरण्यात आल्याचे ई-मेल पाठवण्यात आले होते. ईमेलमध्ये घृणास्पद भाषेचा वापर करण्यात आला होता. या धमक्‍यांचीही पोलिसांसह प्रशासनाने गंभीर दखल घेतली होती.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news