Chandrayaan-3 mission: चांद्रयान-3 मोहीम यशस्वी करणारे ‘ही’ आहेत उपकरणे | पुढारी

Chandrayaan-3 mission: चांद्रयान-3 मोहीम यशस्वी करणारे 'ही' आहेत उपकरणे

पुढारी ऑनलाईन: भारताच्या चांद्रयान-३ चे लँडर मॉड्यूल चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी उतरले. या मोहीमेच्या यशामुळे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने विश्वविक्रम रचला आहे. या मोहीमेच्या यशासाठी अनेक उपक्रमांचे योगदान महत्त्वाचे आहे. चांद्रयान-२ च्या अपयशानंतर भारताने या उपकरणांच्या रचनेमध्ये महत्वपूर्ण बदल करत चांद्रयान-३ मधील उपकरणांची पुर्नरचना करत ही मोहिम फत्ते (Chandrayaan-3 mission) केली आहे.

Chandrayaan-3 mission: इंटिग्रेटेड मॉड्यूल

चांद्रयान-३ मोहीमेत इंटिग्रेटेड मॉड्यूल तयार करण्यात आले आहे होते. यामध्ये लँडर मॉड्यूल (LM)+ रोव्हर आणि प्रोपल्शन मॉड्यूल (PM) या दोन वेगळ्या उपकरणांचा समावेश होता. हे इंटिग्रेटेड मॉड्यूल भारताचे बाहुबली रॉकेट LVM च्या सहाय्याने २४ जुलै रोजी चंद्राच्या दिशेने श्रीहरीकोटा येथून प्रक्षेपित करण्यात आले. त्यानंतर विविध टप्पे पार करत आज अखेर भारताची चांद्रयान-३ ही मोहिम यशस्वी झाली आहे. ही मोहीम फत्ते करण्यासाठी या उपकरणांनी महत्त्वाची भूमिका (Chandrayaan-3 mission) बजावली आहे.

Chandrayaan-3 – Elements

LVM रॉकेट

आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून १४ जुलै रोजी रॉकेट LVM च्या मदतीने चांद्रयान-३ अवकाशात झेपावले. चांद्रयान मोहीमेसाठी इस्रोने १०० हत्तींचे बळ असणाऱ्या LVM या बाहुबली रॉकेटचा या मोहीमेत महत्त्वाचा सहभाग होतो. भारताचे चांद्रयान-३ नेणारे रॉकेट एलव्हीएम 3 हे देशाचे सर्वात अवजड रॉकेट आहे. या रॉकेटचे वजन 640 टन, लांबी 43.5 मीटर आहे.
इंटिग्रेटेड मॉड्यूलमध्ये पुढील मॉड्यूलचा समावेश होता.

Indian Space Research Organisation

प्रोपल्शन मॉड्यूल (PM)

चंद्राच्या अंतिम कक्षेदरम्यान १७ ऑगस्ट रोजी प्रोपल्शन मॉड्यूल हे लँडर मॉड्यूलपासून वेगळे झाले. यानंतर प्रोपल्शन मॉड्यूल ऑर्बिटरची भूमिका बजावत आहे. प्रोपल्शन मॉड्यूल चंद्राच्या परिघातील वातावरणात फिरत राहिल. हे मॉड्यूल चंद्राच्या कक्षेत राहून पृथ्वीवरून येणार्‍या रेडिएशनचा अभ्यास करेल तसेच पृथ्वीवरील जीवनचिन्हे दिसतात काय? याचाही अभ्यास करेल. हाच डेटा भविष्यात, इतर ग्रह, उपग्रह आणि तार्‍यांवर पृथ्वीप्रमाणे जीवन आहे काय, त्याचा शोध घेण्यास उपयुक्त ठरू शकतो, असे इस्रोने म्हटले आहे.

स्वदेशी लँडर मॉड्यूल (LM)

लँडर : भारताच्या चांद्रयान-३ मोहीमेत लँडर विक्रम मुख्य उपकरण आहे. उपकरणात रेट्रोरिफ्लेक्टर समाविष्ट असून, त्या माध्यमातून चंद्रावरून पृथ्वीवरील रेंजिंगची प्रक्रिया अव्याहतपणे सुरू राहील. सिस्मोग्राफ भूगर्भीय प्रक्रिया समजून घेण्यात मदत करेल. चौथे उपकरण सरफेस थर्मोफिजिकल परीक्षण हे आहे. पटलावरील वरच्या आवरणातील रिगोलिथ तपीय परिचालकता यात मोजली जाईल.

Chandrayaan-3 Lander Module -Views

रोव्हर : रोव्हर प्रज्ञान हे विक्रम लँडरच्या आत ठेवले गेले आहे. यशस्वी लँडिंगनंतर रोव्हर चंद्राच्या भूभागावर उतरवले जाईल. यात अल्फा पार्टिकल एक्साईट स्पेक्ट्रोमीटर एपीईएस व लेजर इंड्यूसड ब्रेकडाऊन स्पेक्ट्रोस्कोपी अशी दोन उपकरणे आहेत. चंद्राच्या भूभागावरील घटक शोधणे, खनिजे व अन्य सामग्रीबाबत माहिती पुरवणे, हे त्याचे मुख्य कार्य असेल.

Chandrayaan-3 Rover on Ramp and Deployed Views

चांद्रयान-3 चे महत्त्व काय?

चंद्राच्या अशा भागात लँडर उतरणार आहे, ज्याची काहीही माहिती आजवर उपलब्ध नाही.
चंद्रावरील सोने, प्लॅटिनियम, युरेनियम आदी खनिज संपत्तीचा शोध घेतला जाणार आहे.
अंतराळात चीनला प्रतिआव्हान देणे, या द़ृष्टिनेही ही मोहीम महत्त्वाची आहे.

हेही वाचा:

Back to top button