Chandrayaan 3 Moon Landing | इतिहास घडवण्यासाठी अवघे काही तास बाकी; चांद्रयान-३ मोहिमेला द्या 'या' शुभेच्छा अन् संदेश | पुढारी

Chandrayaan 3 Moon Landing | इतिहास घडवण्यासाठी अवघे काही तास बाकी; चांद्रयान-३ मोहिमेला द्या 'या' शुभेच्छा अन् संदेश

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताच्या चांद्रयान-३ मोहिमेची अतुरता अवघ्या विश्वाला लागली आहे. दरम्यान, जगभरातील लोकांकडून भारताचे चांद्रयान-३ विषयी विविध प्रश्न विचारुन ‘Google’ वर सर्च केले जात आहे. तसेच चांद्रयान-३ ला शुभेच्छा आणि यशस्वी झाल्यानंतरचे मेसेज मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तुम्ही देखील भारताच्या चांद्रयान मोहिमेला अशाप्रकारे शुभेच्छा आणि संदेश देऊ शकता. (Chandrayaan 3 Moon Landing)

भारताची ही चांद्र मोहीम अवघ्या जगासाठी कुतूहल ठरत आहे. दरम्यान, गुगल सर्च इंजिनवर नेटकऱ्यांकडून चांद्रयान लँडिगची तारीख आणि वेळ, चांद्रयान-३ चे अपडेट, चांद्रयान-३ न्यूज, चांद्रयान-३ विषयी शुभेच्छा आणि संदेश यांसारखे विषय सर्च केले जात आहेत. ट्विटरसह (एक्स), इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर देखील चांद्रयान मोहिम ट्रेडिंगवर आहे. चला तर जाणून भारताच्या आजच्या चांद्रयान मोहिमेविषयी (chandryan 3 Messeges) अधिक…

आज ‘या’ वेळी चांद्रयान-३ चे विक्रम लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार

श्रीहरीकोटा येथून 14 जुलै रोजी झेपावलेले चांद्रयान-३ आज 40 दिवसांनी चंद्रावर उतरणार आहे. आज (दि.२३) सायंकाळी सहा वाजून चार मिनिटांनी चांद्रयानाचे विक्रम लँडर चंद्रावर उतरणार असून, त्याच्या अर्धा तास आधी अंतिम टप्प्याला प्रारंभ होईल. बंगळूरच्या ‘इस्रो’च्या मिशन ऑपरेशन कॉम्प्लेक्स अर्थात मुख्य नियंत्रण कक्षातून या सॉफ्ट लँडिंगची सारी सूत्रे हाताळली जाणार आहेत.

chandryan 3 Messeges: चांद्रयान-३ चंद्रावर उतरताना पाहा लाईव्ह

ISRO वेबसाइट – https://www.isro.gov.in/
ISRO यूट्यूब – https://www.youtube.com/@isroofficial5866/about
ISRO फेसबुक – https://www.facebook.com/ISRO/
डीडी नॅशनल टीव्ही- https://www.youtube.com/@DoordarshanNational

चांद्रयान-३ मोहिमेला द्या ‘या’ शुभेच्छा अन् संदेश

‘चाँद तारों को, छूने की आशा….
भारताच्या चांद्रयान मोहीमेला शुभेच्छा!
——————————————
चंद्रावर पाऊल टाकत
आज भारताने इतिहास घडवला
चांद्रयान-३ चे चंद्रावर यशस्वी लँडिंग
———————————————-
भारताच्या अंतराळ क्षमतेवर शंका घेणाऱ्या देशांना
आज भारताने ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार बनवले
————————————————
चंद्र-तारेसुद्धा तुझ्या नावाने नतमस्तक झाले असतील
जेव्हा मोठ्या अभिमानाने चंद्रावर तिरंगा फडकला असेल
भारताची चांद्रयान मोहीम अखेर फत्ते
———————————————-
स्वप्न तुटले होते, पण हिंमत नाही
मोहिम अयशस्वी झाली होती, पण संपली नव्हती
अखेर चांद्रयान-३ चंद्रावर अवतरले

हेही वाचा:

Back to top button