Chandrayaan 3 Moon Landing: ‘असे’ असतील ‘लँडिंग मॉड्युल’ चंद्रावर उतरवण्याचे टप्पे | पुढारी

Chandrayaan 3 Moon Landing: 'असे' असतील 'लँडिंग मॉड्युल' चंद्रावर उतरवण्याचे टप्पे

पुढारी ऑनलाईन: चांद्रयान-३ चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यासाठी आता काही तासच बाकी आहेत. आज सायंकाळी ५ वाजून ४४ मिनिटांनी चांद्रयान-३ च्या लँडींगची प्रक्रिया सुरू होणार आहे. तर आज सायंकाळी ६ वाजून, ४ मिनिटांनी चांद्रयान-३ मोहीमेचे लँडिंग मॉड्युल चंद्रावर उतरणार आहे. या मोहीमेच्या यशाकडे अवघ्या विश्वाचे लक्ष लागले आहे. चला तर जाणून घेऊया कसे असेल लँडिंग मॉड्युल (Chandrayaan 3 Moon Landing) उतरवण्याचे टप्पे…

Chandrayaan 3 Moon Landing: 

पहिला टप्पा : या टप्प्यात यान 30 कि.मी. अंतरावरून साडेसात कि.मी. अंतरावर आणले जाईल. यासाठी 690 सेकंदांचा वेळ लागेल.

दुसरा टप्पा : या टप्प्यात अंतर 6.8 कि.मी. अंतरावर आणले जाईल. यावेळी यानाचा वेग प्रतिसेकंद 350 मीटर इतका अल्प असेल.

तिसरा टप्पा : यानाला चंद्रापासून 800 मीटर उंचीपर्यंत आणले जाईल. येथून दोन थ्रस्टर इंजिन त्याला उतरवतील. या टप्प्यात यानाचा वेग आणखी कमी केला जाईल.

चौथा टप्पा : या टप्प्यात यानाला 150 मीटर्सच्या आसपास आणले जाईल. याला व्हर्टिकल डिसेंट असे म्हणतात. याचा अर्थ होतो उभे लँडिंग.

पाचवा टप्पा : या टप्प्यात यानात लागलेले सेन्सर व कॅमेर्‍याकडून मिळणार्‍या लाईव्ह इनपूटला पूर्वीच स्टोअर केल्या गेलेल्या रेफरन्स डेटाशी जोडले जाईल. या डेटामध्ये 3,900 पेक्षा अधिक छायाचित्रे समाविष्ट आहेत, जेथे चांद्रयान-3 उतरवण्याची जागा निश्चित केली गेली आहे. यात तुलना केल्यानंतर लँडिंगची जागा योग्य आहे की नाही, याचा निर्णय घेता येऊ शकेल. जर लँडिंगसाठी जागा योग्य नाही, असे वाटले तर अशा परिस्थितीत त्याला उजव्या किंवा डाव्या बाजूला वळवले जाईल. या टप्प्यात यान चंद्राच्या भूपृष्ठापासून 60 मीटरपर्यंत आणले जाईल.

सहावा टप्पा : हा या मोहिमेतील सर्वात महत्त्वाचा शेवटचा टप्पा असेल. यावेळी लँडरचा वेग प्रतिसेकंद 1 ते 2 मीटर इतकाच असणार आहे. यामध्ये लँडरला थेट चंद्राच्या भूभागावर उतरवले जाईल आणि येथेच भारत खर्‍या अर्थाने विश्वविक्रमादित्य होईल.

हेही वाचा:

Back to top button