Stock Market Closing Bell | सेन्सेक्स २५३ अंकांनी वाढून बंद, BSE Midcap चा नवा उच्चांक | पुढारी

Stock Market Closing Bell | सेन्सेक्स २५३ अंकांनी वाढून बंद, BSE Midcap चा नवा उच्चांक

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय शेअर बाजारात शुक्रवारी (दि. १७) सलग दुसऱ्या दिवशी तेजी कायम राहिली. सेन्सेक्स २५३ अंकांनी वाढून ७३,९१७ वर बंद झाला. तर निफ्टी ६२ अंकांच्या वाढीसह २२,४६६ वर स्थिरावला. आजच्या ट्रेडिंक्ष सत्रात बीएसई मिडकॅपने नवा विक्रमी उच्चांक नोंदवला. तर स्मॉलकॅप उच्चांकाजवळ पोहोचला. बीएसई मिडकॅप १.१ टक्क्यांनी तर स्मॉलकॅप १.३ टक्क्यांनी वाढून बंद झाला.

गेल्या काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात परदेशी गुंतवणूकदारांचा विक्रीवर जोर राहिला आहे. पण देशांतर्गत खरेदी कायम राहिल्याने बाजाराला सपोर्ट मिळाला आहे.

बाजारातील ठळक घडामोडी

  • शेअर बाजार सलग दुसऱ्या दिवशी तेजीत बंद
  • बाजारातील तेजीत ऑटो, रियल्टी, कन्झ्यूमर ड्युरेबल्स निर्देशांक आघाडीवर
  • निफ्टी IT मध्ये घसरण
  • बीएसई मिडकॅपचा नवा विक्रमी उच्चांक
  • स्मॉलकॅप सर्वकालीन उच्चाकांवरून केवळ १०० अंक दूर

बाजार रिकव्हरी मूडमध्ये

लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु झाल्यानंतर शेअर बाजारात घसरणीबरोबरच चढ-उतार प्रचंड दिसून आला. आता चौथ्या टप्प्यातील वाढलेल्या मतदानाच्या आकडेवारीने बाजार आता निवडणुकीच्या निकालांबद्दल अधिक आशावादी दिसत असल्याचे विश्लेषकांचे म्हणण आहे. यामुळे बाजारात तेजी परतली आहे.

Sensex वर शेअर्स तेजीत

सेन्सेक्सवर एम अँड एमच्या शेअर्सने ५ टक्क्यांनी वाढून २,५०६ रुपयांवर व्यवहार केला. त्याचसोबत जेएसडब्ल्यू स्टील, अल्ट्राटेक सिमेंट, कोटक बँक, एनटीपीसी, टाटा मोटर्स, मारुती, आयटी हे शेअर्सही वाढले. तर टीसीएस, नेस्ले इंडिया, इन्फोसिस, विप्रो, एचसीएल टेक, हिंदुस्तान युनिलिव्हर या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.

sensex closing
sensex closing

Nifty वर काय परिस्थिती?

एनएसई निफ्टीवर एम अँड एम, ग्रासीम, जेएसडब्ल्यू स्टील, अल्ट्राटेक सिमेंट, बीपीसीएल हे शेअर्स टॉप गेनर्स राहिले. तर सिप्ला, टीसीएस, एचसीएल टेक, एसबीआय लाईफ, हिंदुस्तान युनिलिव्हर हे शेअर्स घसरले.

Nifty 50
Nifty 50

M&M शेअर्सची रॉकेट भरारी

महिंद्रा अँड महिंद्रा (M&M) चा शेअर्स शुक्रवारी ७.७ टक्क्यांपर्यंत वाढून २,५५७ रुपयांच्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचला. मार्च तिमाहीत कंपनीने बाजाराच्या अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केल्याने त्यांचे शेअर्स वधारले आहेत. M&M ने महसुलात ११ टक्क्यांची वाढ दर्शविली आहे.

FII नी ३.५ अब्ज डॉलर्स काढून घेतले

लोकसभा निवडणुकीदरम्यान गेल्या काही दिवसांत भारतीय शेअर बाजारात अनिश्चितता दिसून आली. ब्लूमबर्गच्या आकडेवारीनुसार, जागतिक गुंतवणूकदारांनी मे महिन्यात आतापर्यंत भारतीय शेअर बाजारातून ३.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक काढून घेतली आहे.

अमेरिकेच्या Dow Jones चा विक्रमी उच्चांक

अमेरिकेच्या शेअर बाजारातील डाऊ जोन्स इंडस्ट्रियल ॲव्हरेज निर्देशांकाने १६ मे रोजी ४० हजारांचा टप्पा गाठला. ३० हजारांचा टप्पा गाठल्यानंतर जवळपास साडेतीन वर्षांनी डाऊ जोन्सने ४० हजाराला स्पर्श केला. वाढलेला कॉर्पोरेट नफा, महागाईत घट आणि व्याजदर कपातीबद्दल वाढलेली अटकळ यामुळे या निर्देशांकाला उच्चांकी विक्रमाला गवसणी घालण्यास मदत झाली आहे. मार्च २०२० दरम्यान कोरोना साथीच्या काळात हा निर्देशांक १८ हजार अंकापर्यंत घसरला होता.

हे ही वाचा :

Back to top button