भाजप समर्थक मुस्‍लिम महिलेला जमावाची अमानूष मारहाण, राजस्‍थानमधील संतापजनक घटना | पुढारी

भाजप समर्थक मुस्‍लिम महिलेला जमावाची अमानूष मारहाण, राजस्‍थानमधील संतापजनक घटना

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : राजस्‍थानमध्‍ये एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. भाजपचे समर्थन ( BJP supporter )  करत असल्‍याच्‍या कारणातून मुस्‍लीम महिलेला ( Muslim woman) जमावाने अमानूषपणे मारहाण केली. हा प्रकार जयपूरमधील कल्‍याण कॉलनीत घडला, असे वृत्त ‘फस्‍ट पोस्‍ट’ने दिले आहे.

जयपूर शहरातील कल्‍याण कॉलनीत महिला राहते. तिच्‍या घराच्‍या भिंतीवर भारतीय जनपा पक्षाचे चिन्‍ह रेखाटण्‍यात आले होते. तसेच पक्षाच्‍या समर्थनात घोषणाही लिहिल्‍या होत्‍या. हा प्रकार कॉलनीतील काहींच्‍या नजरेच पडला. यानंतर जमावाने महिलेल्‍याचा घरावर चाल केली. ( BJP supporter Muslim woman )

बिथरलेल्‍या जमावाकडून महिलेवर हल्‍ला, अमानूष मारहाण

जमाव महिलेच्‍या घरासमोर आला. तिच्‍या घराचा मुख्‍य दरवाजा तोडला. महिलेने स्‍वत:ला कोंडून घेतलेल्‍या खोलीचाही दरवाजा तोडला. यानंतर तिला घराबाहेर आणून चिखलात फेकण्‍यात आले. तसेच महिलांनी तिला बेदम मारहाण केली. जमावाने कोणतीही दयामाया दाखवली नाही, क्षुल्लक मुद्द्यावरून तिला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. सुदैवाने मालपुरा गेट पोलिस घटनास्थळी वेळेवर पोहोचल्याने हिंसक जमावाच्या तावडीतून ती बचावली.

BJP supporter Muslim woman : सात जणांना अटक

या प्रकरणी पोलिसांनी जमावाचे नेतृत्व करणारे नसिरुद्दीन, रशीद, मुस्ताक, इरफान खान, एजाज खान, इकराम देशवाली आणि कलामुद्दीन या संशयितांना अटक करण्‍यात आली आहे. सर्व संशयित आरोपी हे कल्याण नगरचे रहिवासी आहेत.भाजप समर्थक असलेल्या पीडितेने अनेकदा उघडपणे पक्षाच्या नेत्यांची स्‍तुती केली होती, ज्यामुळे कॉलनीतील रहिवाशांमध्ये पूर्ववैमनस्य निर्माण झाले होव, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.

हेही वाचा : 

 

 

Back to top button