सिध्दू मुसेवाला हत्याकांडातील आरोपी सचिन बिश्नोईला अझरबैझानहून आणले | पुढारी

सिध्दू मुसेवाला हत्याकांडातील आरोपी सचिन बिश्नोईला अझरबैझानहून आणले

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्या प्रकरणातील आरोपी सचिन बिष्णोई याला अझरबैझानमधील बाकू शहरातून भारतात आणले गेले आहे. या हत्याकांडाचा मास्टर माईंड लाॅरेन्स बिष्णोई याचा सचिन हा भाचा आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेकडून ही माहिती देण्यात आली.

सिध्दू मुसेवाला याच्या हत्येच्या काही दिवसांआधी बनावट पासपोर्टवर सचिन बिष्णोई अझरबैझानला फरार झाला होता. त्याला परत आणले गेल्याने मुसेवाला हत्याकांडातील बरीच माहिती बाहेर येण्याचा पोलिसांचा अंदाज आहे. लाॅरेन्स बिष्णोईचा दुसरा साथीदार विक्रमजित सिंग उर्फ विक्रम बराड याला अलिकडेच संयुक्त अरब अमिरातीतून आणले गेले होते. व्यापार आणि उद्योगपतींच्या टारगेट किलिंग प्रकरणात बराड हा आरोपी आहे. सिध्दू मुसेवाला याची मे 2022 मध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. ही हत्या लाॅरेन्स बिष्णोई आणि गोल्डी बराड टोळीचे केल्याचे नंतर उघडकीस आले होते.

सिद्धू मूसेवाला हत्‍या प्रकरणी पंजाब पोलिसांना मोठे यश मिळाले होते. या प्रकरणातील मुख्‍य आरोपी गँगस्‍टर सचिन बिश्‍नोई याला अजरबैजान येथे अटक करण्‍यात आली होती. बिश्‍नोई हा लाँरेंस गँगला बाहेरुन आदेश देत असल्‍याचे पोलिस चौकशीत स्‍पष्‍ट झाले होते.
पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला याची हत्या मानसा जिल्ह्यातील जवाहरके नावाच्या गावात झाली होती. मुसेवाला हत्‍याकांड प्रकरणी २६ ऑगस्‍ट रोजी पोलिसांना १ हजार ८५० पानांचो दोषारोपपत्र दाखल केले आहे. यामध्‍ये एकुण २४ आरोपी असून यातील २० जणांना अटक करण्‍यात आली आहे. चार आरोपींनी विदेशात आश्रय घेतला होता. यामध्‍ये मुख्‍य आरोपी सचिन बिश्‍नोईचाही समावेश होता.

सचिन बिश्‍नोई याने दिली होती खुनाची सुपारी

सिद्धू मुसेवाला यांच्या खुनाची सुपारी कॅनडास्थित गँगस्टर गोल्डी बरार ( Goldy Brar )  याने घेतली होती. बिश्नोई यानेच तुरुगांतून मुसेवाला यांच्या खुनाची सुपारी दिली असल्याची कबुली गोल्‍डी याने दिली होते. बिश्नोईचे दिल्ली, राजस्थान, पंजाब, हरयाणा, हिमाचल प्रदेश अशा विविध राज्यांत गुन्हेगारीचे जाळे पसरले आहे. बिश्नोई आधी विद्यार्थी चळवळीत कार्यरत होता नंतर त्याने वाहने चोरी सारखे गुन्हे सुरू केले. बिश्नोईच्या गँगमध्ये ७०० च्यावर गुंड आहेत. बिश्नोईने एकदा अभिनेता सलमान खानला ठार करू जाहीर धमकी दिली होती. राजस्थानमधील गँगस्टर आनंदपाल सिंग पोलीस कारवाईत मारला गेला, त्यानंतर सिंग याच्या टोळीतील अनेक गुंड बिश्नोई टोळीत सामील झालेहोते. आता मुसेवाला यांच्‍या हत्‍यनंतर पंजाबमध्‍ये गँगवॉरचा भडका उडण्‍याची शक्‍यता आहे.

कोण आहे गोल्‍डी बरार?

सध्‍या कॅनडामध्‍ये वास्‍तव्‍यास असणारा २८ वर्षीय गोल्‍डी बरार याचे मूळ नाव सतिंदर सिंग असे आहे. कॉलेजपासूनच त्‍याचा वावर गुन्‍हेगारांबरोबर सुरु झाला. पंजाब पोलिसांना विविध गुन्‍ह्यात हवा असणारा गोल्‍डीला न्‍यायालयाने फरार घोषित केले आहे. खून, खूनाचा प्रयत्‍न, खंडणी अशा गंभीर स्‍वरुपाचे तब्‍बल १६ हून अधिक गुन्‍हे त्‍यांच्‍यावर दाखल आहेत. टोळीचा म्‍होरक्‍या लॉरेंस बिश्‍नोई याला अटक झाल्‍यानंतर टोळीचे सर्व व्‍यवहार हे गोल्‍डीकडे आले. पंजाबमधील अनेकगुन्‍ह्यांमधील तो वॉडेंट आहे. काही दिवसांपूर्वी फरीदपूर न्‍यायालयाने जिल्‍हा युवा काँग्रेसचे अध्‍यक्ष गुरलाल सिंह पहलवान यांच्‍या हत्‍या प्रकरणी बरार याच्‍याविरोधातअटक वाँरट जारी केले होते.

हेही वाचा :

 

Back to top button