उन्‍हाळ्यात ‘डिहायड्रेशन’ टाळा, पाणी पिताना ‘या’ टिप्‍स फॉलो करा

उन्‍हाळ्यात ‘डिहायड्रेशन’ टाळा, पाणी पिताना ‘या’ टिप्‍स फॉलो करा
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : योग्य प्रमाणात पिण्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत, जगण्‍यातील सर्वात मौल्‍यवान घटन असणार्‍या पाण्‍याला आपण 'जीवन'ही म्‍हणतो. तर काही जण त्‍याला अमृत असेही संबोधतात. तुम्‍हाला माहित असेल, मानवी शरीराचा जवळजवळ ७० टक्‍के पाणी असेत. ( water live in body ) पाणी शरीराचे तापमान संतुलित राखण्यासाठी कार्य करते. मागील काही दिवसांमध्‍ये यंदा उन्‍हाच्‍या झळा अधिक तीव्र झाल्‍या आहेत. उन्हाळ्यात कडक उन्‍ह्यात फिरणे, अति व्यायाम करणे आणि पाणी कमी प्यायल्यामुळे 'डिहायड्रेशन'चा त्रास होतो.

'डिहायड्रेशन'ची लक्षणे

सतत तहान लागणे, डोके दुखी, लघवीचा रंग बदलणे किंवा कमी होणे, त्‍वचा कोरडी पडणे, चक्‍कर येणे किंवा अशक्‍तपणा ही 'डिहायड्रेशन'ची लक्षणे आहेत.कडक उन्‍ह्यात जाणे टाळावे तसेच उन्‍हात जास्‍त काळ फिरु नये, उन्‍ह्यात जाताना डोक्‍यावर टोपी किंवा छत्री घेऊन जाणे आणि सर्वात महत्त्‍वाचे योग्‍य प्रमाणात पाणी पिणे यामुळे डिहायड्रेशनचा त्रास टाळता येतो.शरीरातील पाणी पातळी स्‍थिर ठेवण्‍यासाठी खालील टीप्‍स तुम्‍हाला मदत करतील.

water live in body : बाहेर जाताना नेहमी पाण्याची बाटली बाळगा

शरीराचे तापमान राखण्यासाठी द्रव संतुलन राखणे महत्वाचे आहे. त्‍यामुळेच उन्‍हाळ्यात शरीराला पाण्‍याची गरज अधिक लागते. तुम्‍ही घर असाल तर स्‍वच्‍छ पाणी सहज उपलब्‍ध होते;पण तुम्‍ही कामानिमित्त घराबाहेर असाल तर शरीरातील पाणी संतुलन कायम ठेवण्‍यासाठी पाण्याची बाटली नेहमी सोबत बाळगणे हा सर्वात सोपा मार्ग आहे. कामाच्‍या गडबड आपण पाणी पिणं विसरतो. अशा परिस्थितीत पाण्याची बाटली तुमच्‍या जवळ असणे फायदेशीर ठरते. यामुळे तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता भासणार नाही.

water live in body : पाणी पिण्‍याची वेळ ठरवा

दिवसभर पाणी पिणे अत्यंत आवश्यक आहे. शरीराला पाण्‍याची कमतरता जाणवली तर रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. तहान लागल्‍यावर तत्‍काळ पाणी पिणे शरीरासाठी योग्‍य ठरते. त्‍याचबरोबर दिवसभरात ठरावीक वेळेस पाणी पिण्‍याची सवय तुमच्‍या शरीरातील पाण्‍याचे संतुलन कायम ठेवते. जेवण करण्‍याच्‍या ३० ते ४५ मिनिटे आधी एक ग्‍लास पाणी पिणे आरोग्‍यासाठी लाभदायक मानले जाते. दिवसभरात तुम्‍ही पाणी पिण्‍याची वेळ वेळ ठरवा.

दिवसाची सुरुवात पाणी पिण्‍याने करा

अनेक अभ्यासांनी पाण्याचे सेवन शरीरातील चरबी कमी करण्याशी जोडलेले आहे कारण पिण्याचे पाणी पाउंड कमी करण्यास आणि वजन कमी करण्यास मदत करते. त्‍यामुळे तुमच्‍या दिवसाची सुरुवात तुम्‍ही पाणी पिऊन करा. एक ग्लास पाणी तुम्हाला हायड्रेशन तर देईलच; पण ताजेतवाने वाटेल. तसेच सकाळी उठल्‍यावर तुमच्‍या क्षमतेनुसार पाणी पिल्‍यास पचन सुधारण्यास मदत होते. उन्‍हाळ्याच्‍या दिवसात शक्‍य असल्‍यास तुम्ही नारळ पाण्यानेही सुरुवात करू शकता.

water live in body : पाणी पिण्‍याची योग्‍य वेळ कोणती?

'पाणी पिण्याची योग्य वेळ कधी आहे? असा प्रश्‍न अनेकांना असतो. जेवण करण्यापूर्वी, जेवण दरम्यान अल्‍प आणि जेवण झाल्यावर एक ते दीड तासांनी पाणी प्यायल्याने अन्नाचे पचन चांगले होते. यामुळे लाळेचे उत्पादन करण्यास मदत करते ज्यामध्ये इलेक्ट्रोलाइट्स, श्लेष्मा आणि एन्झाईम असतात जे अन्न पचण्यास मदत करतात आणि तोंडी आरोग्य राखण्यास मदत करतात. अन्नाचे पचन तोंडातून सुरू होते आणि वयाबरोबर लाळेचे उत्पादनही कमी होते. जर तुम्हाला तुमचे तोंड कोरडे वाटत असेल तर पाण्याचे सेवन वाढवा.

फळांचे रस प्या

नेहमी पाणी पिण्‍याचा कंटाळा आला असेल तर उन्हाळ्यात लिंबू, अननस, आंबा तसेच आले आणि पुदिन्याची पाने यांसारखी ताजी आणि हंगामी फळांचा रसाचे सेवन करुन तुम्‍ही डिहायड्रेशनचा त्रास कमी करु शकता.

(वरील सामान्‍य माहिती वैद्यकीय उपायांचा पर्याय नाही. अधिक तपशिलांसाठी तज्ज्ञांचा किंवा तुमच्‍या डॉक्‍टरांचा सल्‍ला घ्‍या. )

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news