Swimming for Good Health : उत्तम आरोग्यासाठी पोहणे हा प्रभावी व्यायाम | पुढारी

Swimming for Good Health : उत्तम आरोग्यासाठी पोहणे हा प्रभावी व्यायाम

  • डॉं. भारत लुणावत

हवेच्या तुलनेत पाण्याची घनता अधिक आहे. त्यामुळे गुरूत्वाकर्षणाचा प्रभाव निष्क्रिय होतो. त्यामुळेच अन्य व्यायाम प्रकारात शरीरातील सांध्यांवर येणारा आवेग किंवा ताण पोहण्यामध्ये (Swimming for Good Health) येत नाही. पाण्यात सांध्यावर दबाव पडत नाही. एवढेच नव्हे, तर तीव्र झटक्यांपासून ही पाणी सुरक्षितता प्रदान करतं. जलतरणाच्या सर्व प्रकारात गती नियंत्रित होते. तसेच पाण्याच्या प्रतिरोधामुळे ती कमी होते..

हृदयविकाराचा त्रास असणाऱ्या रुग्णांनाही जलतरणामुळे हृदयाच्या ठोक्यांचा वेग तसेच हृदय आणि रक्त नलिकेच्या आजारापासून असणारा धोका नियंत्रणात ठेवता येतो. (Swimming for Good Health) पोहण्यामुळे फुफ्फुसांची क्षमता वाढते. त्याच बरोबर शरीराच्या सर्व मांसपेशींची शक्ती वाढते. शरीरात आजार निर्माण करणाऱ्या कॅलरीज याद्वारे कमी होतात. शरीराचे वजनही घटते. वाढत्या उकाड्यामुळे उन्हाळ्यात व्यायाम करताना घामाने जीव मेटाकुटीला येतो. त्यावेळी पोहण्याने शरीराला थंडावा मिळण्याबरोबरच नवी ताकद मिळवून देते. त्यामुळेच पोहण्याला आरोग्याचा जवळचा मित्र किंवा राजमार्ग मानले जाते.

अन्य व्यायामांच्या तुलनेत पोहणे हा प्रभावी व्यायाम प्रकार आहे. तसेच सर्व वयोगटातील व्यक्ती हा व्यायाम आरामात करू शकतात. पोहण्यामुळे आपल्या संपूर्ण शरीराला व्यायाम (Swimming for Good Health) मिळतो. कोणत्याही सांध्यांवर ताण न येऊ देता श्वसन, हृदय आणि रक्ताभिसरणाच्या कार्यात सुधारणा घडवून आणतो. म्हणून कडक उन्हाळ्यात तीव्र उकाड्यामध्ये शरीराला थंडावा देणाऱ्या जलतरणाला प्राधान्य दिले पाहिजे.

अन्य एरोबिक व्यायाम प्रकाराच्या (पळण्यासह) तुलनेत पोहण्याचा व्यायाम करताना शरीराच्या कमरेखालील आणि वरील भागाला एकाच वेळी व्यायाम होतो. (Swimming for Good Health) शरीरातील सर्व मांसपेशीचा वापर होतो. बॅकस्ट्रोक वगळता जलतरणाच्या सर्व प्रकाराला शरीराच्या वरील भागात, पोट, नितंब, कंबरेपासून पायाचा भाग आणि पावलांसहीत सर्व अवयव आणि त्यातील मांसपेशींना गतिमानता प्राप्त होते. वजन घटवण्यासाठी पोहणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. साधारणपणे ६० किलो वजनाची एखादी व्यक्ती रोज एक तास पोहत असेल, तर त्या व्यक्तीच्या ५४० ते ६५० कॅलरी जळतात.

Swimming for Good Health : काळजी घ्या

कोणताही स्विमिंग पूल निवडण्यापूर्वी त्याची माहिती घ्या. त्या जलतरण तलावातील पाण्याची नियमित तपासणी केली जाते याची खातरजमा करून घ्या. प्रथमच जलतरणसाठी जात असाल, तर कोणताही संसर्गजन्य आजार नसल्याची खात्री डॉक्टरांकडून करून घ्या. पोहण्यानंतर डोळे, नाक-कान किंवा घशात वेदना किंवा खाज येणे असा त्रास सुरू झाला, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. क्लोरिनयुक्त पाण्यात पोहण्याने हृदय विकाराची समस्या उद्भवू शकते असे म्हटले जाते. हा विवादास्पद विषय असला, तरी त्यात काही अंशी तथ्य असावे. पाणी निर्जंतूक करण्यासाठी क्लोरीन सर्वात स्वस्त आणि सर्वत्र उपलब्ध असणारा पर्याय आहे. असे असले तरी त्याचे प्रमाण ठरलेले आहे. त्यामुळेच शास्त्रशुद्ध प्रमाणातील क्लोरीनचा वापर असणाऱ्या पाण्यामध्ये पोहल्याने त्रास होत नाही.

हे ही वाचा :

khashaba Movie – “सैराट” नंतर नागराज मंजुळेंचा येतोय चित्रपट “खाशाबा”

श्रद्धा कपूरचा नो फिल्टर मॉर्निंग लूक

Back to top button