

पुढारी डिजीटल : पालक मुलांच्या वाढत्या वयातील आहाराबाबत कायमच चिंतेत असतात. मुलं नेहमी काहीतरी चमचमीत आणि इन्स्टंट फूड खाण्यासाठी आग्रही असतात. पण अशा खाण्याने मुलांच्या आरोग्यावर परिणाम होतोच. पण त्यांच्या वाढीवरही हे अन्न परिमाण करताना दिसतं. खरं तर दिवसभर मुलांना काय खायला द्यावं याविषयी अनेकदा लिहिलं आणि बोललं जातं. पण खरा प्रश्न आहे तो मुलांना सकाळी उठल्यावर काय खायला द्यायचं याचा.
सकाळी उठल्यावर बहुतांश मुलं दूध पिण पसंत करतात. अनेकदा चॉकलेट मिल्क किंवा दूध बिस्किट अशा प्रकरचा नाश्ता सकाळी सकाळी मुलांना दिला जातो. पण यासोबतच असेही काही पदार्थ आहेत ज्यामुळे मुलांच्या आहारात अगदी छोटे बदल करून पोषणाची क्षमता वाढवण शक्य आहे. या पदार्थांचा समावेश तुम्ही मुलांच्या सकाळच्या आहारात करू शकता.
बदाम : बदाम हे शरीराच्या पोषणासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. फायबर, विटामीन ई, लोह हे पुरेपूर प्रमाणात असतात. उत्तम स्मरणशक्ती आणि रोग्यप्रतिकारशक्तिसाठी मुलांना उपाशीपोटी बदाम जरूर द्या.
कोमट पाणी : वजन कमी करण्यासाठी आपल्यापैकी अनेकजण सकाळी सकाळी कोमट पाणी पितात. पण तुम्हाला माहिती आहे का सकाळी उठून पिलेलं कोमट पाणी शरीराला व्हायरल आजारांपासून दूर ठेवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. फक्त हे कोमट पाणी मुलांना देताना त्याचं तापमान नियंत्रित असेल याची काळजी घ्या.
गूळ घातलेला मुरांबा : मुलं गोड खाण्यासाठी कायमच उत्सुक असतात. पण सकाळी साखर किंवा आर्टिफिशल स्वीटनर देण्याऐवजी गूळ हा सर्वोत्तम पर्याय आहे. त्यामुळे मुलांना multigrain ब्रेड सोबत किंवा नुसताच गूळ घातलेला मुरांबा देऊ शकता.
केळी – सफरचंद : सकाळी उपाशीपोटी फळ खाण्याचा सल्ला अनेक आहारतज्ञ देतात. पण मोठेच नाही तर लहान मुलांनीही उपाशीपोटी फळं खाणं फायदेशीर ठरू शकतं . त्यापैकी सफरचंद झिंक आणि लोहाचा मोठा स्त्रोत आहे. यामुळे दृष्टीही सुधारण्यास मदत होते. तर केळीमध्ये सोडियम, पोटॅशियम हे घटक प्रचुर प्रमाणात असतात. त्यामुळे ही दोन्ही फळं मुलांना उपाशीपोटी खायला देणं त्यांच्यासाठी फायदेशीर आहे.