SBI Recruitment 2021: कस्टमर सपोर्ट executive पदांसाठी भरती | पुढारी

SBI Recruitment 2021: कस्टमर सपोर्ट executive पदांसाठी भरती

पुढारी ऑनलाईन डेस्क

SBI Recruitment 2021 :भारतीय स्टेट बँकेकडून ६०६ पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. यात कार्यकारी (दस्तऐवज संरक्षण-संग्रहण) साठी १ पद, रिलेशनशिप मॅनेजरसाठी ३१४ पोस्ट, रिलेशनशिप मॅनेजरसाठी २० पोस्ट (टीम लीड), ग्राहक समर्थन कार्यकारी साठी २१७ पोस्ट, १२ गुंतवणूक अधिकारी पदासाठी, सेंट्रल रिसर्च टीम (प्रॉडक्ट लीड) साठी २ पदे, सेंट्रल रिसर्च टीम (सपोर्ट) साठी २ पदे, व्यवस्थापक (मार्केटिंग) साठी १२ पदे, उप व्यवस्थापक (मार्केटिंग) साठी २६ पदे, या पदांसाठी भारतीय स्टेट बँकेने अर्ज मागविले आहेत.

पात्रता

रिलेशनशिप मॅनेंजर : सरकारी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी, किमान ३ वर्षांचा कामाचा अनुभव.

रिलेशनशिप मॅनेंजर (टीम लीड) : सरकारी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवीप्राप्त, किमान ८ वर्षांचा कामाचा अनुभव.

अधिक माहितीसाठी (https://sbi.co.in/web/careers/current-openings) येथे क्लिक का.

वयोमर्यादा

रिलेशनशिप मॅनेजर – २३ ते ३५ वर्षे
रिलेशनशिप मॅनेजर (टीम लीड) – २८ ते ४० वर्षे
कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव्ह  – २० ते ३५ वर्षे
गुंतवणूक अधिकारी – २८ ते ४० वर्षे
सेंट्रल रिसर्च टीम (प्रॉडक्ट लीड) – ३० ते ४५ वर्षे
सेंट्रल रिसर्च टीम (सपोर्ट) – २५ ते ३५ वर्षे
व्यवस्थापक (मार्केटिंग) – ४० वर्षे
उपव्यवस्थापक (मार्केटिंग) – ३५ वर्षे
एक्झिक्युटिव्ह – ३० वर्षे

अर्ज कसा करावा?

वरील पदांसाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा (https://sbi.co.in/web/careers/current-openings).

अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ ऑक्टोबर २०२१ आहे. (SBI Recruitment 2021)

हेही वाचलत का?

Back to top button