Pushpa : अलू अर्जुनसोबत एका आयटम साँगसाठी नोरा फतेहीने किती कोटी मागितले ? - पुढारी

Pushpa : अलू अर्जुनसोबत एका आयटम साँगसाठी नोरा फतेहीने किती कोटी मागितले ?

पुढारी ऑनलाईन डेस्क

साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदन्ना स्टारर चित्रपट पुष्पा Pushpa part 1 सध्या चर्चेत आहे. लोकांच्या नजरा या चित्रपटाच्या प्रत्येक अपडेटवर असतात. चित्रपटाची कथा गावाच्या पार्श्वभूमीवर मांडण्यात आली आहे. ज्यामध्ये अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदन्ना अगदी वेगळ्या लूकमध्ये दिसत आहेत. त्यामुळे या चित्रपटाबद्दल बरीच चर्चा आहे. निर्माते चित्रपटाच्या पहिल्या भागासाठी जबरदस्त आयटम सॉन्ससाठी तयारी करत आहेत. ज्यासाठी अनेक बॉलिवूड अभिनेत्रींना संपर्क करण्यात आला आहे.

Pushpa  : अनेक अभिनेत्रींचा नकार

या यादीमध्ये दिशा पटानी, जॅकलिन फर्नांडिस, पूजा हेगडे आणि इतर अनेक ग्लॅमरस अभिनेत्रींना निर्मात्यांनी संपर्क साधला आहे. जी स्टायलिश स्टार अल्लू अर्जुनसह डान्स फ्लोर चांगलीच हवा करू शकेल. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या सर्व अभिनेत्रींनी अल्लू अर्जुनच्या चित्रपटाची ऑफर नाकारली आहे. दरम्यान, निर्मात्यांनी या आयटम साँगसाठी आणखी एक स्टार नोरा फतेहीशी संपर्क साधला आहे.

Pushpa : नोराच्या मागणीने भूवया उंचावल्या

अभिनेत्री नोरा फतेहीने जूनियर एनटीआर स्टारर दिग्दर्शक पुरी जगन्नाथ यांच्या चित्रपट टेम्परमध्ये डान्स आयटम साँग सादर करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यानंतर, अभिनेत्रीने बाहुबली आणि किक 2 सारख्या दक्षिण चित्रपटांमध्ये आयटम डान्स करून खळबळ उडवून दिली आहे. नंतर, अभिनेत्री नोरा फतेहीने जॉन अब्राहम स्टारर चित्रपट सत्यमेव जयते मधील दिलबर गाण्यावर नृत्य करून ‘दिलबर गर्ल’ चा टॅग मिळवला. आता अभिनेत्री दक्षिण आणि उत्तर दोन्ही सिने जगातील करोडो लोकांच्या हृदयावर राज्य करते.

अशा स्थितीत अल्लू अर्जुनसोबत डान्सिंग फ्लोअरवर नोरा फतेहीपेक्षा चांगले कोण दिसू शकते. पण इथे ट्विस्ट म्हणजे अभिनेत्रीने चित्रपटाच्या फक्त एका गाण्यासाठी एवढी मोठी रक्कम मागितली आहे की दिग्दर्शक सुकुमारला मोठा धक्का बसला आहे.

समोर आलेल्या वृत्तानुसार, अभिनेत्रीने या चित्रपटाच्या गाण्यासाठी पूर्ण २ कोटी रुपयांची मागणी केली आहे. विशेष म्हणजे यापूर्वी अभिनेत्रीने आयटम साँगच्या ४ दिवसांच्या शूटसाठी फक्त ४ लाख रुपये घेतले होते. याला स्टारडम म्हणतात. आता निर्मात्यांना ठरवायचे आहे की ते अभिनेत्री नोरा फतेहीची मागणी पूर्ण करू शकतील की नाही. किंवा मेकर्स तिच्या जागी दुसऱ्या अभिनेत्रीचा विचार करतील.

हे ही वाचलं का?

Back to top button