Crime News : खुनीहल्ल्यातील फरार हल्लेखोर अखेर जेरबंद | पुढारी

Crime News : खुनीहल्ल्यातील फरार हल्लेखोर अखेर जेरबंद

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा : आंबी (ता. हवेली) येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ यात्रेच्या दिवशी किरकोळ कारणावरून योगेश रामचंद्र निवंगुणे (वय 30, रा. कुंबळवाडी, आंबी, ता. हवेली) याच्यावर खुनीहल्ला करणार्‍या सहा फरार हल्लेखोरांना हवेली पोलिसांनी बुधवारी (दि. 24) अटक केली. तसेच एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले. न्यायालयाने 6 हल्लेखोरांना सोमवार (दि. 29) पर्यंत पोलिस कोठडीत, तर अल्पवयीन मुलास बालसुधारगृहात ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

तेजस ऊर्फ वैभव गणेश निवंगुणे (वय 21, रा. आंबी, ता. हवेली), मयूर अशोक कडू (वय 22, रा. किरकटवाडी, ता. हवेली), आदित्य साहेबराव साळुंखे (वय 20, रा. वडगाव बुद्रुक, पुणे), रोहन गजानन महाडिक (वय 20, सध्या रा. कात्रज, पुणे. मूळ रा. कुर्तवडी, पानशेत), स्वप्निल शाहूराज शिंदे (वय 22, रा. फुरसुंगी, ता. हवेली) व विकास सतीश यादव (वय 19, रा. कोंढवा रोड, कात्रज, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या हल्लेखोरांची नावे आहेत. तर एक हल्लेखोर अल्पवयीन आहे.

आंबी गावात मंगळवारी (दि. 23) यात्रेच्या दिवशी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास हल्लेखोरांनी योगेश रामचंद्र निवंगुणे याच्यावर लोखंडी हत्याराने वार केले होते. त्यात तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली होती. वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट देऊन तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार हवेली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन वांगडे, सहायक पोलिस निरीक्षक विकास आडागळे व सहायक पोलिस निरीक्षक सागर पवार यांच्या पथकाने आंबी, सिंहगड रोड, पानशेत परिसरात एकाच वेळी ठिकठिकाणी छापे टाकून फरार झालेल्या हल्लेखोरांना जेरबंद केले. यातील काही हल्लेखोर सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर शहर व जिल्ह्यातील पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. दरम्यान हल्लेखोरांनी वापरलेली हत्यारे तसेच अन्य फरार हल्लेखोरांचा शोध सुरू असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक सागर पवार यांनी सांगितले.

हेही वाचा

Back to top button