Lasalgaon Crime : बनावट नोटाप्रकरणी महिला डॉक्टरसह ५ जण अटकेत | पुढारी

Lasalgaon Crime : बनावट नोटाप्रकरणी महिला डॉक्टरसह ५ जण अटकेत

लासलगाव ; पुढारी वृत्तसेवा :

लासलगाव येथे बनावट नोटा चलनात आणणाऱ्या टोळीचा लासलगाव पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. (Lasalgaon Crime) बनावट नोटा प्रकरणी एका महिला डॉक्टरसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, लासलगाव व परिसरात (Lasalgaon Crime) बनावट चलन व्यवहारात आणणारी टोळी सक्रिय असल्‍याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यांनी पाचशे रुपयांच्या २९१ बनावट चलनी नोटा व्यवहारात आणल्या होत्या.

मोहन बाबुराव पाटील व डॉ. प्रतिभा बाबुराव घायाळ ( दोघे, रा. लासलगाव), विठ्ठल चंपालाल नाबरीया (रा. कृषीनगर) हे बनावट नोटा चलनात आणत असल्याची खात्रीलायक माहिती होती. त्यांच्याकडे सखोल चौकशी करण्‍यात आली. रवींद्र हिरामण राऊत (रा. पेठ) व विनोद मोहनभाई पटेल (रा. पंचवटी, नाशिक) हे  ५०० रुपयांच्या चलनी नोटा देणार असल्याची माहिती मिळाली.

असा रचला सापळा

पोउनि रामकृष्ण सोनवणे, राजेंद्र अहिरे,हवालदार बाळू सांगळे, पोलीस नाईक कैलास महाजन, योगेश शिंदे, संदीप शिंदे यांचे पथक तयार केले. पो कॉ. प्रदीप आजगे, गणेश बागुल, कैलास मानकर, सागर आरोटे, देविदास पानसरे, महिला पोलिस शिपाई मनीषा शिंदे यांनी सापळा रचला. येवला रोड विंचुर येथे सापळा रचण्यात आला.

मोहन पाटील, डॉ. प्रतिभा घायाळ, विठ्ठल नाबरीया यांना बनावट ५०० दराच्या २९१ नोटा देण्यासाठी काही जण आले. त्यावेळी रवींद्र हिरामण राऊत (रा. पेठ) व विनोद मोहनभाई पटेल (रा. पंचवटी – नाशिक) यांना ताब्यात घेण्‍यात आले. पंचासमक्ष छापा टाकून  कार क्रमांक  ( एमएच ०३ सीएच ३७६२) मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आली.

याबाबत पोलिस अधीक्षक सचिन पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक माथुरी कांगणे, पोलीस उपअधीक्षक सोमनाथ तांबे यांचे मर्गदर्शन मिळाले. लासलगावचे  सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

५०० रुपयांच्‍या बनावट नाेटा व्यवहारात आणल्याप्रकरणी पोलिस कॉ. प्रदीप आजगे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल झाला. लासलगाव पोलिस स्टेशनला वरील व्यक्तींविरुध्द भादंवि कलम ४८९ क, ई प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि रामकृष्ण सोनवणे करीत आहेत.

हेदेखील वाचा-

Back to top button