घाऊक महागाई निर्देशांक २४ महिन्यांच्या नीचांकी स्तरावर | पुढारी

घाऊक महागाई निर्देशांक २४ महिन्यांच्या नीचांकी स्तरावर

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा – सरत्या जानेवारी महिन्यात घाऊक महागाई निर्देशांक ४.९५ टक्क्यांच्या तुलनेत ४.७३ टक्के इतका नोंदविला गेला आहे. महागाई दराचा हा गेल्या २४ महिन्यांचा नीचांकी स्तर आहे.

खाद्यान्न श्रेणीतील वस्तू आणि भाजीपाल्याचे दर उतरल्याने महागाई दर कमी होण्यास मदत मिळाली असल्याचे व्यापार मंत्रालयाकडून सांगण्यात आले. विशेष म्हणजे सलग आठव्या महिन्यात घाऊक महागाई निर्देशांकात घट झालेली आहे. गतवर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात हा निर्देशांक ५.८५ टक्के इतका होता तर डिसेंबर महिन्यात ४.९५ टक्के इतका होता.

घाऊक महागाई निर्देशांकात घट नोंदविण्यात आली असली तरी जानेवारी महिन्यातला किरकोळ महागाई निर्देशांक मात्र वाढलेला आहे. व्यापार मंत्रालयाने अलीकडेच किरकोळ महागाई निर्देशांकाचे आकडे जारी केले होते. डिसेंबरमधील ५.७२ टक्क्यांच्या तुलनेत जानेवारी महिन्यात ६.५२ टक्के इतका किरकोळ महागाई दर नोंदविण्यात आला होता.

हेही वाचा : 

 

Back to top button