पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये दुसरा कसोटी सामना शुक्रवार (दि. १७ ) पासून दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. या सामन्याला भारताचा अष्टपैलू खेळाडू श्रेयस अय्यर मुकण्याची शक्यता आहे. ( IND vs AUS 2nd Test ) श्रेयरच्या पाठीला दुखापत झाली आहे. त्यामुळे सध्या तो बंगळूर येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये ( एनसीए ) पुनरागमनासाठीच्या प्रक्रियेतून जात आहे. त्याने प्रशिक्षक एस. रजनीकांत यांच्या बरोबरील सरावाचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
नियमानुसार, एखादा खेळाडू दुखापतग्रस्त झाला तर त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी देशातंर्गत सामना खेळणे अनिवार्य असते. त्यामुळे फीट असला तरी अय्यर हा ऑस्ट्रेलिया विरुद्ध दिल्ली येथे होणाऱ्या दुसर्या कसोटी सामना खेळू शकणार नाही. कसोटी सामन्यात त्याला सलग ९० षटकांसाठी क्षेत्ररक्षण आणि पुन्हा फलंदाजी अशी दुहेरी जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय निवड समिती श्रेयसची निवड इराणी करंडक स्पर्धेतील शेष भारताच्या संघात करणार का? हे पाहावे लागले. कारण यापूर्वी रवींद्र जडेजा याला फिटनेस टेस्टसाठी रणजी ट्रॉफीत खेळण्याची सूचना करण्यात आली होती.
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हाही दुखापतीतू सावरत आहे. मात्र तो पूर्णत: फीट होण्याची प्रक्रिया खूपच संथ आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्ध चार कसोटी सामन्यांच्या मालिकेनंतर होणार्या वनडे मालिकेसाठी तो संघात सहभाग होणार का, हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरीत आहे. कारण कसोटी क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने धडक मारली तर या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध बुमराह हा मोठी कामगिरी करु शकतो. त्यामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे मालिकेतही तो खेळणार नाही. जसप्रीत बुमराह हा आता यंदाच्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल ) मुंबई इंडियन संघांकडून खेळेल, अशी अपेक्षा आहे.
हेही वाचा :