आता घर घेऊन फिरा इकडे तिकडे, व्हिडिओ आला समोर | पुढारी

आता घर घेऊन फिरा इकडे तिकडे, व्हिडिओ आला समोर

नवी दिल्ली : आपले स्वत:चे एक घर असावे, असे जगभरातील प्रत्येकाचे स्वप्न असते. बरेचजण दिवस-रात्र कष्ट करून हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडत असतात. एक घर बनण्यासाठी जितका पैसा खर्च होतो तितका वेळही त्यासाठी द्यावा लागतो. साधारणत: आपला स्वप्नांचा बंगला तयार होण्यासाठी पाच महिन्यांपासून ते दोन वर्षांपर्यंतचाही कालावधी लागू शकतो. मात्र, नुकताच घरासंबंधीचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

या व्हिडीओत मिनिटाच्या आत एक लक्झरिअस घर बनताना पाहावयास मिळते. हा व्हिडीओ देशातील नामांकित उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्विटर हँडल @anandmahindra वर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एक बॉक्स दाखविण्यात आला आहे. हा बॉक्स जसजसा उघडला जातो तसतसे एक लक्झरियस घर आकार घ्यायला लागते. हे फोल्डिंग हाऊस 500 स्क्वेअर फूट इतके असून, त्याची किंमत अंदाजे 40 लाख रुपये इतकी आहे. ते कुठेही सहजरीत्या घेऊन जाता येऊ शकते. 41 सेकंदांचा हा व्हिडीओ आतापर्यंत 6.9 मिलियनवेळा बघितला गेला आहे. 40 हजारांपेक्षा जास्त लोकांनी त्याला लाईक केले आहे.

Back to top button