इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी Ola कडून २०० कर्मचाऱ्यांना नारळ- रिपोर्ट | पुढारी

इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी Ola कडून २०० कर्मचाऱ्यांना नारळ- रिपोर्ट

पुढारी ऑनलाईन डेस्क : इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी ओला (Ola) ने त्यांच्या सुमारे २०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. एका कर्मचाऱ्यांच्या हवाल्याने बिझनेस टुडेने याबाबत वृत्त दिले आहे. एका गेल्या आठवड्यात कंपनीतून काढून टाकलेल्या एका कर्मचाऱ्याने म्हटले आहे की, “या आठवड्यात Ola कडून सुमारे २०० कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले आहे.” सदर कर्मचारी हा टेक्नॉलॉजी टीमचा एक भाग होता. त्याला काढून टाकल्याने तो आता इतर ठिकाणी नोकरीची संधी शोधत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ओला कॅब, राइड हॅलिंग व्यवसाय आणि ओला इलेक्ट्रिकमध्ये नोकरकपात करण्यात आली आहे. ही कंपनी गेल्या सप्टेंबरपासून त्यांच्या कर्मचार्‍यांची संख्या २०० ने कमी करण्याचा विचार करत होती. कंपनीने म्हटले होते की त्याच्या दोन प्रमुख व्यवसायांतील अतिरिक्त मनुष्यबळ कमी करण्यासाठी २०० अभियंत्यांना काढून टाकले जाईल.

इलेक्ट्रिक वाहनांची निर्माती करणाऱ्या ओला इलेक्ट्रिकने डिसेंबर २०२२ मध्ये भारतात २५ हजार इलेक्ट्रिक स्कूटर्स लाँच केली होती. ओलाचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी ट्विट करत म्हटले होते की यामुळे त्यांची बाजारातील हिस्सेदारी ३० टक्क्यांवर पोहोचली. त्यांनी पुढे म्हटले होते की “आम्ही २५ हजार स्कूटर्सची विक्री केली आणि आम्ही इलेक्ट्रिक स्कूटर्स संदर्भात असलेला आमचा बाजारातील हिस्सा ३० टक्क्यांपर्यंत वाढवला. भारताच्या ईव्ही क्रांतीने खऱ्या अर्थाने सुरुवात केली आहे! वर्ष २०२३ हे आमच्यासाठी आणखी मोठे असेल.”

आर्थिक वर्ष २०२१ मध्ये कंपनीच्या महसुलात ६५ टक्क्यांनी घट होऊन तो ६८९.६१ कोटी रुपये होता.

हे ही वाचा :

Back to top button