Ola Electric scooter : ओला इलेक्ट्रिक बाईकनं पेट्रोल वाहनांचा बाजार उठवला, सेकंदाला ४ बाईक्सचं बुकिंग, पहिल्या २४ तासांत ६०० कोटींची विक्री | पुढारी

Ola Electric scooter : ओला इलेक्ट्रिक बाईकनं पेट्रोल वाहनांचा बाजार उठवला, सेकंदाला ४ बाईक्सचं बुकिंग, पहिल्या २४ तासांत ६०० कोटींची विक्री

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन : देशभरात सध्या ओला इलेक्ट्रिक बाईकची चर्चा सुरू आहे. ओला इलेक्ट्रिकच्या (Ola Electric scooter) माहितीनुसार ओला एस १ स्कूटर या मॉडेलच्या तब्बल सहाशे कोटींच्या बाईक्स विकल्या गेल्याचे सांगण्यात आले. (ola electric sold scooters worth rs 600 crore in a day 4 scooters per second in first 24hrs)

ज्या ग्राहकांनी पहिल्यांदा बाईकचे बुकिंग केले आहे. त्यांना वितरण करण्याचे काम कंपनीकडून करण्यात येत आहे. ओलाने असा दावा केला आहे की २४ तासांमध्ये दर सेकंदाला ४ स्कूटर (Ola Electric scooter) विकल्या जात असल्याचे सांगितले आहे.

ओलाचे सीईओ भावीश अग्रवाल यांच्या माहितीनुसार

ओलाचे सीईओ भावीश अग्रवाल यांनी ट्विट करून कंपनीच्या या कामगिरीबद्दल आनंद व्यक्त केला आहे. ते म्हणाले, भारतीय इलेक्ट्रिक वाहनांना पसंती देत आहे तर पेट्रोल वाहनांना नाकारत आहेत! आम्ही प्रति सेकंद ४ स्कूटर विकल्या आणि एका दिवसात ६०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या स्कूटरचा बिझनेस झाल्याचे त्यांनी सांगितले.

ग्राहकांना ओला एस१ आणि एस१ प्रो खरेदी करण्याचा कालचा शेवटचा दिवस होता. ज्या लोकांनी या बाईकचे बुकिंग केले आहे त्याची खरेदी प्रक्रिया आजपासून सूरू होणार असल्याचे सीईओ म्हणाले.

ज्यावेळी या बाईकची विक्री थांबेल त्यानंतर पुन्हा बुकिंगला सुरूवात होणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. याचबरोबर ओला बाईकचे बुकिंग फक्त त्यांच्या अधिकृत अॅपवर करता येणार आहे.

ओला एस 1 ईएमआयवर तुम्हाला २९९९ रुपयांपासून पुढे मिळणार आहे.  तर ओला एस 1 प्रोसाठी ईएमआय ३,१९९ रुपयांपासून पासून सूरू होणार आहे.

याचबरोबर तुम्ही अधिक रक्कम भरतेवेळी बाईक कधी मिळणार तसेच इतर माहितीही देण्यात येणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

ओलाने फ्यूचर फॅक्टरीला देखील आश्वासन दिले आहे की जेव्हा खरेदीदारांना ओला स्कूटर पाठवली जाईल तेव्हा अचूक वितरण तारीख दिली जाईल.

नवीन स्कूटर एस 1 प्रो १८१ किमी पर्यंत ड्रायव्हिंग रेंज आणि ११५ किमी प्रतितासाच्या टॉप स्पीडसह बाजारात येणार आहे.

Back to top button