Aftab Shraddha Case :आफताबच्या उत्तरांच्या विश्लेषणासाठी आता मानसशास्त्रज्ञांची मदत घेणार | पुढारी

Aftab Shraddha Case :आफताबच्या उत्तरांच्या विश्लेषणासाठी आता मानसशास्त्रज्ञांची मदत घेणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था ; पॉलिग्राफ आणि नार्को चाचण्यांत आफताब पूनावालाने दिलेल्या काही उत्तरांमुळे पोलिसांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली असून आफताबच्या (Aftab Shraddha Case) वर्तणूक व उत्तरांच्या विश्लेषणासाठी मानसशास्त्रज्ञांची मदत घेण्याची तयारी केली आहे. वाचा सविस्तर बातमी.

Aftab Shraddha Case : मानसशास्त्रज्ञांची मदत घेणार

श्रद्धा वालकरच्या खुनात अटकेत असलेल्या आफताबच्या मागील आठवड्यात पॉलिग्राफ व नार्को चाचण्या झाल्या होत्या. या चाचण्यांचे विश्लेषण करण्याचे काम सुरू असून त्यातील बारीक बारीक मुद्दे पोलीस तपासून पाहात आहेत. या दोन्ही चाचण्यांत काही प्रश्नांना आफताबने अत्यंत शांतपणे व संतुलितरीत्या इतकी सारखी उत्तरे दिली आहेत की, पोलिसांना तो पक्की पूर्वतयारी करून आला होता की काय, असा संशय आहे. त्यामुळे आफताबचे वर्तन व उत्तरांचे विश्लेषण करण्यासाठी मानसशास्त्रज्ञांची मदत घेतली जाणार आहे. याआधीच्या अनेक चौकशांमधून आफताबने दिलेली उत्तरे व दोन चाचण्यांत दिलेली उत्तरे यांची पडताळणी सुरू आहे. काही ठिकाणी आपण मनोरुग्ण असल्याचे भासावे यासाठी विचित्र उत्तरे आफताबने दिली असावीत, असाही पोलिसांना संशय आहे.

हेही वाचा

Back to top button