Gujarat Election 2022 : रवींद्र जडेजाची पत्नी अन् हार्दिकला भाजपकडून उमेदवारी | पुढारी

Gujarat Election 2022 : रवींद्र जडेजाची पत्नी अन् हार्दिकला भाजपकडून उमेदवारी

पुढारी ऑनलाईन डेस्क : गुजरातमध्ये यंदा २ टप्प्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. १ आणि ५ डिसेंबर २०२२ या दोन दिवशी मतदान होणार आहे. तर ८ डिसेंबरला मतमोजणी होईल. पहिल्या टप्प्यात ८९ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडेल. दरम्यान, भाजपकडून गुरूवारी (दि.१०) १६० उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची पत्नी रीवाबा जडेजा आणि काँग्रेसमधून नुकतेच भाजपमध्ये दाखल झालेले पाटीदार समजाचे नेते हार्दिक पटेल यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. रीवाबा जडेजा यांना जामनगर उत्तर तर हार्दिक पटेल यांना वीरमगास मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. (Gujarat Election 2022)

प्रगती आणि विकासाचे मुद्दे महत्वपूर्ण : रीवाबा जडेजा

जामनगर उत्तरमधून उमेदवारी देण्यात आलेल्या रीवाबा जडेजा म्हणाल्या की, प्रगती आणि विकासाचे मुद्दे आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी माझ्यावर विश्वास टाकला, याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करते. (Gujarat Election 2022)

भाजपकडून १६० उमेदवारांची यादी जाहीर, हार्दिक पटेलांना वीरमगासमधून उमेदवारी

गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यात ८९ जागांसाठी मतदान होणार आहे. याबाबत ५ नोव्हेंबरला अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. १४ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहेत. तर १७ नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. यामुळे सर्व पक्षांमध्ये उमेदवारी देण्यावरून मोठा खल सुरू आहे. आम आदमी पक्षाकडून १२ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. भाजपने गुरूवारी १६० उमेदवारांची यादी जाहीर केली. काँग्रेस पक्षाकडूनही लवकरच उमेदवारी जाहीर करण्यात येणार आहे. (Gujarat Election 2022)

आम्ही सर्व रेकॉर्ड तोडणार आहोत : भूपेंद्र पटेल (Gujarat Election 2022)

भाजपकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पटेल यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कठोर परिश्रम करत आहोत. भाजप सर्वांत मोठा पक्ष होणार असून आम्ही पूर्वीचे सर्व रेकॉर्ड तोडणार आहोत. (Gujarat Election 2022)

हेही वाचलंत का?

Back to top button