सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड गोल्डी ब्रारचा अमेरिकेत गोळ्या झाडून खून | पुढारी

सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड गोल्डी ब्रारचा अमेरिकेत गोळ्या झाडून खून

पुढारी ऑनलाईन डेस्‍क ; पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी ( मास्टरमाईंड) गँगस्टर गोल्डी ब्रार याची अमेरिकेत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. डल्ला-लखबीर टोळीने गोल्डीच्या हत्येची जबाबदारी घेतली आहे. एका अमेरिकन वृत्तवाहिनीने दावा केला आहे की, गोल्डी ब्रार याची अमेरिकेतील फेअरमॉन्ट आणि हॉल्ट एव्हेन्यू येथे मंगळवारी सायंकाळी गोळ्या झाडून हत्‍या करण्‍यात आली.

पंजाबमधील मुक्तसर साहिब जिल्ह्यात 1994 मध्ये जन्म झालेल्‍या गोल्डी ब्रारचे खरे नाव सतींदरजीत सिंग होते. त्‍याचे वडील पंजाब पोलिसातून निवृत्त उपनिरीक्षक आहेत. पंजाबी गायक सिद्धू मूसवालाच्या हत्येनंतर त्याचे नाव मीडियात चर्चेत आहे. त्‍याच्‍या नावार अनेक गुन्‍हे दाखल होते. चंदीगडमध्ये चुलत भाऊ गुरलाल ब्रारच्या हत्येनंतर गोल्डी ब्रारने गुन्हेगारीच्या जगात प्रवेश केला.

पंजाब युनिव्हर्सिटी (PU) चे विद्यार्थी नेते गुरलाल ब्रार यांची 11 ऑक्टोबर 2020 रोजी रात्री चंदीगडमधील औद्योगिक क्षेत्र फेज-1 येथे असलेल्या क्लबबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली हाेती. गोल्डी ब्रार याचा चुलत भाऊ गुरलाल ब्रार हा लॉरेन्स बिश्नोई याचा निकटवर्ती होता. गुरलाल ब्रारच्या हत्येनंतर लॉरेन्स गँगने सोशल मीडियावर लिहिलं होतं की, “आता नवे युद्ध सुरू झाले आहे, रस्त्यावर रक्त आटणार नाही.”

दरम्यान, गोल्डी ब्रार स्टडी व्हिसावर कॅनडामध्ये शिकण्यासाठी गेला होता. कॅनडातूनच गोल्डीने खुनाचा कट रचायला सुरुवात केली. त्याच्या गुंडांनी अनेक हत्‍या घडवून आणल्या. 18 फेब्रुवारी 2021 रोजी पंजाबमधील फरीदकोट येथे जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष गुरलाल सिंग यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली हाेती. गोल्डी ब्रारने आपल्या भावाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी युवक काँग्रेस नेत्याची हत्या केल्‍याचे तपासात स्‍पष्‍ट झाले हाेते.

मुसेवालांच्‍या हत्‍येनंतर गोल्‍डीचे नाव चर्चेत

29 मे 2022 रोजी पंजाबमधील मानसा जिल्ह्यातील जवाहरके गावाजवळ पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येची जबाबदारी गोल्डी ब्रार यांनी घेतली होती. मोहालीतील मिड्डूखेडा येथील हत्येमध्ये सहभागी असलेल्या लोकांना मूसेवालाच्या व्यवस्थापकाने आश्रय दिला होता. नंतर मूसवालाने त्याच्या व्यवस्थापकाला मदत केली. या शत्रुत्वामुळे लॉरेन्स टोळीने मूसवाला यांची हत्या केल्‍यावे गोल्‍डीने म्‍हटले होते.

केंद्राने ब्रारला केले हाेते दहशतवादी घोषित

कॅनडात राहून भारतात गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या गँगस्टर गोल्डी ब्रारविरोधात केंद्र सरकारने धडक कारवाई केली होती. बेकायदा कृत्यविरोधी प्रतिबंध कायद्याअंतर्गत ( यूएपीए ) गोल्डी ब्रारला दहशतवादी घोषित करण्यात आलं होते.

हेही वाचा :

Sidhu Moosewala Mother: तंत्रज्ञानाची कमाल | सिद्धू मुसेवालाच्या आईने ५८ व्या वर्षी दिला मुलाला जन्म; फोटो आला समोर

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Back to top button