Gold Smuggling : अंतर्वस्त्रातून 1 कोटी 72 लाख रुपयांच्या सोन्याची तस्करी, तीन महिलांना अटक | पुढारी

Gold Smuggling : अंतर्वस्त्रातून 1 कोटी 72 लाख रुपयांच्या सोन्याची तस्करी, तीन महिलांना अटक

पुढारी ऑनलाइन डेस्क : Gold Smuggling सोन्याची तस्करी करण्यासाठी तस्कर अनेक प्रकारच्या युक्त्या वापरतात. आता चक्क अंतर्वस्त्रातून तब्बल 1 कोटी 72 लाख रुपयांच्या सोन्याच्या तस्करीचे प्रकरण समोर आले आहे. हैदराबाद विमानतळावर सीमा शुल्क विभागाने अशा प्रकारे तस्करी करताना तीन महिलांना अटक केली आहे. याशिवाय दुबई येथून येणा-या आणखी दोन लोकांकडून देखिल जवळपास 855 ग्राम सोने जप्त करण्यात आले आहे.

Gold Smuggling सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीमा शुल्क विभागाला सातत्याने सोने तस्करीच्या सूचना मिळत होत्या. सीमा शुल्क विभागाने मिळालेल्या सूचनेनुसार सुरक्षा व्यवस्था वाढवली. यावेळी त्यांनी संशय आल्यामुळे एका प्रवासी महिलेला तपासणीसाठी थांबवले. यावेळी तिच्या जवळ सोने सापडले. महिलेने तिच्या अंतर्वस्त्रामध्ये सोने लपवले होते. या व्यतिरिक्त तिच्या हेअरबँडमध्ये देखिल हे सोने लपवण्यात आले होते.

महिलेकडून जवळपास 234 ग्राम सोने जप्त करण्यात आले. ही महिला दुबईवरून फ्लाइटने हैदराबादला पोहोचली होती. या महिलेची तपासणी केल्यानंतर आणखी दोन संशयित महिलांची तपासणी करण्यात आली. त्यांच्याकडूनही सोने जप्त करण्यात आले. तिन्ही महिलांनी त्यांच्या अंतर्वस्त्रामध्ये सोने लपवले होते. तिघीही दुबईवरून भारतात सोने तस्करी करून आणत होत्या.

Gold Smuggling या व्यतिरिक्त सीमा शुल्क विभााने आणखी दोघांना सोन्याच्या तस्करी प्रकरणी अटक केली आहे. हे दोघेही पुरुष प्रवासी कुवेत येथून फ्लाइटने हैदराबादला आले होते. त्यांच्या बॅगेची तपासणी केली असता त्यामध्ये सोन्याच्या दोन काठ्या आणि बटन सापडले. कारवाईत विभागाने दोघांकडून तब्बल 855 ग्राम वजनाचे सोने जप्त केले आहे. सीमा शुल्क विभाग पाच ही आरोपींची अधिक चौकशी करत आहे.

हे ही वाचा:

दिवाळीनंतर उडणार लग्नाचे बार, सोने खरेदीला आली बहर

पुणे : बुटातून सोन्याच्या बिस्कीटांची तस्करी; ७०५ ग्रॅम सोने जप्त

Back to top button