

पुणे : पुढारी वृत्तसेवा
दुबईतून पुण्यात प्रवास करताना एकाने तब्बल 34 लाख 81 हजांच्या सोन्याच्या बिस्कीटांची तस्करी आपल्या पायातील बुटामधून केल्याचा प्रकार सीमा शुल्क विभागाच्या (कस्टम) गुप्तचर यंत्रणेणी उघडीस आणला आहे. यावेळी संबंधीत प्रवाशाकडून 705 ग्रॅम वजनाची सोन्याची बिस्कीटे जप्त करण्यात आली आहे.
या प्रवाशाकडे केलेल्या तपासात तो दुबई ते अहमदाबाद आणि त्याच विमानाने पुण्यात उतरला होता. तपासणी वेळी हा सर्व प्रकार समोर आला. चिकटटेपने बिस्किटे गुंडाळून त्याने ती बुटात ठेवून आणली असल्याचे कस्टम विभागाने सांगितले. याप्रकरणी प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. हा सर्व प्रकार 7 फेब्रुवारी रोजी उघडकीस आला.
पुणे कस्टम विभागाने अशीच काही तस्करीची प्रकरणे उघडकीस आणली आहेत. डिसेंबर महिन्यात कसटम विभागाने चेन्नई ते मुंबई असा प्रवास करणार्या एका प्रवाशाकडून 24 कॅरेटचे तब्बल 800 ग्रॅम सोन्याचा 40 लाख 36 हजार रूपये किंमतीचा ऐवज जप्त करून प्रवाशाला अटक केली होती. त्यामध्ये सहा सोनसाखळ्या एका ब्रेसलेटचा समावेश होता. या दोन तस्करीच्या प्रकरणात कस्टम विभागाने त्यांची गुन्हा करण्याची पध्दती उघड केली. 8 फेब्रुवारी रोजी कस्टम विभागाने पुणे विमानतळावरून शारजाह ला जाणार्या प्रवाशाकडून सहा लाखांचे विदेशी चलन जप्त केले आहे.