दिल्लीतील १२ कॉर्पोरेट हॉस्पिटलकडून रुग्णांची लुबाडणूक – CCIचा ठपका | पुढारी

दिल्लीतील १२ कॉर्पोरेट हॉस्पिटलकडून रुग्णांची लुबाडणूक - CCIचा ठपका

दिल्लीतील १२ कॉर्पोरेट हॉस्पिटलकडून रुग्णांची लुबाडणूक - CCIचा ठपका

पुढारी ऑनलाईन – भारतीय स्पर्धात्मक आयोगाने (Competition Commission of India (CCI)  गेली चार वर्ष तपास करून दिल्लीतील चार बड्या दवाखान्यांवर रुग्णांची लुबाडणूक केल्याचा ठपका ठेवला आहे. ही हॉस्पिटले साखळी पद्धतीने काम करतात आणि त्यांचे वर्चस्व असल्याने त्यांनी वैद्यकीय सेवांसाठी फार मोठे शुल्क आकारतात असे Competition Commission of India ने म्हटले आहे. (hospital chains charge excessive pricing)

Money Control या वेबसाईटने ही विशेष बातमी प्रसिद्ध केली आहे. अपोलो हॉस्पिटल्स, मॅक्स हेल्थकेअर, फोर्टिस हेल्थकेअर, सर गंगाराम हॉस्पिटल, बत्रा हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च, सेंट स्टिफन्स हॉस्पिटल यांच्या यात समावेश आहे. Competition Commission of India (CCI)चे आरोप सिद्ध झाले तर या हॉस्पिटलवर त्यांच्या एकूण उलाढालीच्या १० टक्के इतका मोठा दंड होऊ शकतो. Competition Commission of India या संदर्भात या सर्व हॉस्पिटलकडून खुलासा मागितला आहे, त्यानंतर पुढील कारवाईची प्रक्रिया ठरणार आहे.

CCIच्या महासंचालकांनी १२ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलवर हा ठपका ठेवला आहे. “बाजारातील आपल्या वर्चस्वाचा फायदा घेत या हॉस्पिटलनी चुकीच्या पद्धतीने जादा दरांची आकारणी केली आहे.” हॉस्पिटलमधील रूम, औषधं, वैद्यकीय चाचण्या, इतर वैद्यकीय साहित्य यासाठी ही आकारणी झाली असल्याचे या बातमीत म्हटले आहे. काही हॉस्पिटलमधील चार्जेस हे तारांकित हॉटेलपेक्षाही जास्त आहेत, असे CCIने अहवालात म्हटले आहे.

CCIने बनवलेला अशा प्रकारचा हा भारतातील पहिलाच अहवाल आहे. जर याप्रकरणात कारवाई झाली तर हॉस्पिटलमध्ये आकारल्या जाणाऱ्या विविध शुल्कांत पारदर्शकता येईल, असे या बातमीत म्हटले आहे. या १२ हॉस्पिटलमध्ये सहा मॅक्स हेल्थ केअरचे तर २ हॉस्पिटल हे फोर्टिसच्या मालकीचे आहेत. या एकूण प्रकरणात संबंधित हॉस्पिटल आणि CCIच्या वतीने खुलासा करण्यात आलेला नाही.

हेही वाचा

Back to top button