आठवड्यातू ३ दिवस ऑफिसला या – TCSचे कर्मचाऱ्यांना आदेश – TCS calls employees back to office | पुढारी

आठवड्यातू ३ दिवस ऑफिसला या - TCSचे कर्मचाऱ्यांना आदेश - TCS calls employees back to office

आठवड्यातू ३ दिवस ऑफिसला या - TCSचे कर्मचाऱ्यांना आदेश

पुढारी ऑनलाईन – Tata Consultancy Services (TCS) या कंपनीने कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून ३ दिवस ऑफिसला येण्याची सक्ती केलेली आहे. “TCSच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ऑफिसमधून काम सुरू केलेले आहे. TSCचे काम आता ऑफिसमधून सुरू झालेले आहे. ग्राहकही ऑफिसला भेट देत आहेत. तुमचे मॅनेजर तुम्हाला आठवड्यातून ३ दिवस ऑफिसमध्ये येता यावे अशा प्रकारे शिफ्टचे नियोजन करतील,” असे TCSने म्हटले आहे.  (TCS calls employees back to office)

“कोरोनाच्या जागतिक महामारीपूर्वी कर्मचाऱ्यांची ज्या कार्यालयात नेमणूक होती, तेथे त्यांना हजर व्हावे लागेल, तर ज्या कर्मचाऱ्यांनी बदली घेतली आहे, त्यांना बदलीच्या ठिकाणी जावे लागेल,” असे TCSच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे. (TCS Asks All Staff To Return To Office Thrice A Week)

TCSने वर्क फ्रॉम ऑफिस सुरू करण्यासाठी निश्चित अशी वेळ सांगितलेली नाही, पण कर्मचाऱ्यांना आपल्या मॅनेजरशी बोलून कामाच्या वेळा समजून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

TCSच्या ९० टक्के कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले आहे, तर असोसिएट पदावरील २५ टक्के लोक सध्या आठवड्यातून २ दिवस ऑफिसमधून काम करत आहेत. TSCची कार्यपद्धती TCS’ Secure Borderless Workspaces (SBWS) अशी होती, पण आता अधिकाधिक हायब्रीड मॉडेल स्वीकारले जाणार आहे, त्यात कर्मचारी आठवड्यातील काही दिवस ऑफिसमधून काम करतील.

हेही वाचा

Back to top button