राजीव गांधी आणि एन्टोनिया माईनो यांच्या लग्नाचा किस्सा माहीत आहे का? | पुढारी

राजीव गांधी आणि एन्टोनिया माईनो यांच्या लग्नाचा किस्सा माहीत आहे का?

पुढारी ऑनलाईन डेस्क : इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर अनपेक्षितपणे पंतप्रधानपदाची जबाबदारी पडलेल्या राजीव गांधी यांचे राजकीय जीवन सर्वांनाच माहीत आहे. पण सुखदु:खाच्या सर्वच क्षणांत, राजकारणात आणि कौटुंबीक पातळीवर साथ दिली ती पत्नी सोनिया गांधी यांनी. सोनिया गांधी यांच्या नागरिकत्वावर आता राजकारण होत आहे. मात्र, राजीव आणि सोनिया ही जोडी राजकारणात चर्चित होती. या जोडीच्या लग्नाचा किस्साही नेहमी चर्चेत असतो.

राजीव गांधी इंजिनिअरिंगचा ट्रायपोस कोर्स करण्यासाठी इंग्लडच्या केंब्रिज विद्यापीठात गेले. तेथे त्यांच्यी ओळख एन्टोनिया माईनो अर्थात सोनिया गांधी यांच्याशी झाली.ही ओळख त्यांनी जर्मनीहून आलेल्या क्रिश्चियन नावाच्या एका कॉमन मित्राच्या मदतीने करुन घेतली. पुढेह ही मैत्रीण त्यांची जीवनसाथी बनली.

रूमालावर कविता

इंग्लडमधील एक किस्सा असा आहे की, राजीव गांधी यांनी सोनिया गांधी यांना सौंदर्यावर कविता करून रूमालावर (कविता) लिहून एका वेटरकडून त्यांना दिली होती. यासाठी त्या वेटरने त्यांच्याकडून टीपही घेतली होती व रेस्टॉरंटमध्ये त्यांच्या जवळ बसता यावे म्हणून रेस्टॉरंट मालकाला जादा पैसेही द्यायचे.

त्यानंतर त्यांच्या ओळखीच रुपांतर मैत्रीत झाले. साधारणत: तीन वर्ष त्यांच्या भेटीगाठी सुरु होत्या. भेटीगाठी वाढू लागल्यानंतर मैत्रीच रूपांतर प्रेमात झाले. आणि त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आणि एकदाचा १९६८ ला राजीव गांधी यांनी इटलीच्या नागरीक एन्टोनिया माईनो म्हणजे सोनिया गांधी यांच्याशी विवाह केला.

सांगितले नव्हते ‘मी भारताच्या पंतप्रधानांचा मुलगा आहे’ 

विशेष बाब म्हणजे राजीव गांधी यांनी एन्टोनिया माईनो म्हणजेच सोनिया गांधी यांना आपण भारताच्या पंतप्रधानांचा मुलगा असल्याचे सांगितले नव्हते.
सोनिया गांधी भारतात आल्यानंतर त्या राजीव गांधी यांच्या घरी थांबल्या नव्हत्या. तर त्या हिंदीतील प्रसिद्ध कवी हरिवंशराय बच्चन यांच्या घरी थांबल्या होत्या. त्यांचा मेहंदीचा कार्यक्रम हरिवंशराय बच्चन यांच्या घरी होता. आणि हा विवाह समारंभ २५ फेब्रुवारी १९६८ रोजी हरिवंशराय बच्चन यांच्या घरी दिल्ली येथे पार पाडला.

एन्टोनिया माईनो बनल्या सोनिया गांधी 

विवाहानंतर एन्टोनिया माईनो यांच नाव बदलून सोनिया गांधी असे केले गेले. या विवाह समारंभाला अनेक उद्योगपती, राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

हे पाहील का  ?  एक स्त्री आणि दोन पुरूष एकत्र राहू शकतात का? नवी वेबसेरिज ‘सोप्पं नसतं काही ‘

Back to top button