वैदेही-शतजन्माचे आपुले नाते : वैदेही आणि अंध साहिलची प्रेमकहाणी | पुढारी

वैदेही-शतजन्माचे आपुले नाते : वैदेही आणि अंध साहिलची प्रेमकहाणी

मुंबई;पुढारी ऑनलाईन : वैदेही-शतजन्माचे आपुले नाते या मालिकेत वैदेही आणि अंध साहिलची प्रेमकहाणी पाहायला मिळणार आहे. वैदेही-शतजन्माचे आपुले नाते सोम.-शनि., संध्या. ७:३० वा. सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळणार आहे.

अधिक वाचा- 

देव दिखाव्याला नाही श्रद्धेला पावतो. असं सांगणार्‍या या मालिकेत वैदेही ही रामाची निस्सीम भक्त आहे. तिचा चांगल्या स्वभाव आहे. त्यामुळे ती दुसऱ्यांना नेहमी मदत करत असते. सालस आणि समंजस स्वभावाची वैदेही आपल्या कुटुंबासाठी उभी राहते. आपल्या बहिणींसाठी नेहमी खंबीर राहते. आपल्या कुटुंबाची जबाबदारी संभाळतेय. वैदेहीची व्यक्तिरेखा सायली देवधर साकारते आहे.

sayali deodhar abhishek_rahalkar's profile picture abhishek rahalkar
सायली देवधर-अभिषेक रहाळकर

मैत्रीचं रूपांतर प्रेमात होईल का?

साहिल अंध आहे. पण, त्याला कोणाकडून मदत घ्यायला आवडत नाही. वैदेहीचं फुलांचं दुकान जिथे आहे त्याच देवळात साहिल येत असतो. वैदेही आणि साहिल यांची आधीची ओळख आहे. असं प्रेक्षकांना पहिल्या भागात पाहायला मिळालं. आता या दोघांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात होईल का. हे पाहणं प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचं असणार आहे.

अधिक वाचा- 

साहिल ही व्यक्तिरेखा अभिनेता अभिषेक रहाळकर साकारतोय. ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी त्यांनी नाशिकच्या नॅब संस्थेला भेट दिली. त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी जाणून घेतल्या.

अधिक वाचा- 

आपल्या व्यक्तिरेखेचा अभ्यास केला आहे. त्याचा अभ्यास त्याच्या भूमिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळेल. अंध व्यक्तिरेखा साकारण्यासाठी अभिषेकने घेतलेली मेहनत आणि अभ्यास या मालिकेत पाहायला मिळेल.

मराठी मालिका विश्वात अशी आगळीवेगळी प्रेमकहाणी पहिल्यांदाच बघायला मिळणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sayali Deodhar (@deodharsayali)

Back to top button