हार्दिक पटेलांच्या वडिलांचा कोरोनाने मृत्यू | पुढारी

हार्दिक पटेलांच्या वडिलांचा कोरोनाने मृत्यू

अहमदाबाद : पुढारी ऑनलाईन 

गुजरात कॉंग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष हार्दिक पटेल यांच्या वडिलांचे कोरोनाच्या संसर्गामुळे निधन झाले. आज (दि. ९) अहमदाबादमधील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. निधनाचे वृत्त समजताच गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी हार्दिक पटेल यांच्याशी फोनवर बोलून शोक व्यक्त केला. 

भारतीय युवा काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष निखिल सावानी यांनी माहिती देताना म्हटले आहे की, हार्दिक पटेल यांचे वडील भरत पटेल यांचे रविवारी निधन झाले. कोरोना संसर्ग झाल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. 

हार्दिक पटेल हे सुद्धा कोरोना बाधित असून २ मे रोजी त्यांनी ट्विटवरून याबाबत माहिती दिली होती. माझा कोरोनाचा चाचनी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरीच उपचार सुरू आहेत. तुमच्या प्रेम व प्रार्थनेने लवकरच बरा होईन, अशीही भावना त्यांनी व्यक्त केली होती.

Back to top button