मुंबईमध्ये हस्तगत केलेल्या यूरेनियम प्रकरणाचा तपास NIA ने केला सुरु | पुढारी

मुंबईमध्ये हस्तगत केलेल्या यूरेनियम प्रकरणाचा तपास NIA ने केला सुरु

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) ने मुंबईमध्ये हस्तगत करण्यात आलेल्या प्राकृतिक यूरेनियम प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या प्रकरणी दहशतवादविरोधी एजन्सीने गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल केला होता. एनआयएच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार अणुऊर्जा कायदा १९६२ च्या कलम २४ (१) (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, महाराष्ट्र राज्यातील दहशतवादी पथकाने तब्बल सात किलो युरोनियम दोघांकडून हस्तगत केले होते. या दोघांना तत्काळ अटकही करण्यात आली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोघे युरेनियम विक्रीच्या शोधात होते. याची माहिती एटीएसला समजताच त्यांच्यावर छापा टाकण्यात आला व दोघांना युरेनियमसह अटक करण्यात आली. या युरेनियमची किंमत अंदाजे २१ कोटी असल्याने एटीएसने सांगितले. सुरुवातीला दोघांविरूद्ध एटीएस कलाचौकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अधिका-यांच्या म्हणण्यानुसार, पांड्या आणि ताहिर हे युरेनियम कोट्यवधी रुपयांना ऑनलाईन विकण्याचा प्रयत्न करीत होते. महाराष्ट्र एटीएसने डमी ग्राहक पाठविला आणि पदार्थाचा नमुना घेतला. त्यानंतर भाभा अणु संशोधन केंद्रातील तज्ज्ञांकडून घेण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये हा पदार्थ नैसर्गिक युरेनियम असल्याची पुष्टी केली गेली. 

 

Back to top button