देशात आतापर्यंत किती लसीकरण झालयं?  | पुढारी

देशात आतापर्यंत किती लसीकरण झालयं? 

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन डेस्क 

देशभरात कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. देशातील अनेक जिल्ह्यात कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे.भारतात जानेवारी महिन्यात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातीला धीम्या गतीनं झालेल्या लसीकरण मोहिमेला आता चांगलाच वेग आला आहे. देशात लसीकरणही सुरु आहे. सुरुवातीला ४५ वर्षावरील सर्वांना लसीकरण होत. आता १ मे पासून १८ वर्षावरील सर्वांना लसीकरणास सुरुवात झाली आहे.

वाचा : हार्दिक पटेलांच्या वडिलांचा कोरोनाने मृत्यू

देशातील अनेक राज्यात लसींचा तुटवडा सुरु आहे. लस घेणाऱ्या लोकांच्या संख्येत वाढ होत आहे. तरीही दररोज वाढणाऱ्या रुग्णसंख्येनं चिंतेचं वातावरण तयार केलं आहे. बहुतेक राज्यांमधील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्णालयात बेड मिळत नाहीत. तर ऑक्सिजन अभावी अनेकांनी प्राण सोडले आहेत. आता केंद्राने राज्यांना ऑक्सिजन पुरवठा सुरु केला आहे. 

जगभरातूनही देशास मदत होत आहे. महाराष्ट्रात मागिल एक महिन्यांपासून लॉकडाऊन आहे. मुंबई, पुण्यात  रुग्ण कमी झालेत. राज्यात लसीकरणाचा वेग वाढवलाय. १८ वर्षावरील व्यक्तींना लसीचा तुटवडा जाणवत आहे.  

९ मे रोजी आलेल्या आकडेवारीनूसार देशात १६ कोटी ९४ लाख ३९ हजार ६६३ एवढे लसीकरण झाले आहे. यात मागील २४ तासांत देण्यात आलेल्या २० लाख २३ हजार ५३२  डोस देण्यात आले आहेत. ही माहिती भारत सरकारने अधिकृत जाहीर केली आहे. 

राज्यात १८ वर्षावरील सर्वांनाच लसीचा तुटवडा आहे. कोविन ॲप वरुन नोंदणी होते. पण लस मिळत नसल्यांने काही ठिकाणी गोंधळ निर्णाण होत आहे. आज राज्यातील बऱ्याच लस केंद्रावर लस उपलब्ध नसल्यामुळे लस केंद्र बंद ठेवण्यात आली होते. 

वाचा : मुंबईमध्ये हस्तगत केलेल्या यूरेनियम प्रकरणाचा तपास NIA ने केला सुरु

Back to top button