Koo App कडून #स्वातंत्र्याचा_अमृतमहोत्सव आयोजन | पुढारी

Koo App कडून #स्वातंत्र्याचा_अमृतमहोत्सव आयोजन

पुढारी ऑनलाईन डेस्क : स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षात पदार्पण करताना देशाने अनेक संघर्षांचा सामना केला आणि प्रतिकूल परिस्थितीतही विजय खेचून आणला आहे. गरिबी, अज्ञान, अंधश्रद्धा, बेरोजगारी, दहशतवाद, नैसर्गिक आपत्ती यासारख्या अनेक अंतर्गत समस्यांशी टक्कर देत देश महासत्ता बनत आहे. देशाच्या या संघर्ष आणि विजयाची गाथा यावर भारतीय म्हणून आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी सहभागी व्हा १४ ऑगस्ट २०२१ रोजी संध्याकाळी ४:०० वाजता कू (Koo App) मराठीच्या स्वातंत्र्यदिन विशेष कार्यक्रमात.

त्याचबरोबर याविषयावरील आपले विचार अनेक मराठी वाचकापर्यंत पोहचविण्यासाठी कू मराठीवरील #स्वातंत्र्याचा_अमृतमहोत्सव या हॅशटॅगमध्ये कविता, लेख किंवा व्हिडिओच्या माध्यमातून आपले विचार व्यक्त करा, असे आवाहनही कूकडून करण्यात आले आहे.

स्वतंत्र भारताचे पहिले स्वदेशी मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म, करोडो भारतीयांना त्यांच्या मातृभाषेत व्यक्त होण्याची संधी देत एकमेकांना जोडणारा दुवा म्हणजे कू अँप (Koo App).

प्रादेशिक भाषांमध्ये स्वतंत्र स्थान आणि खास ओळख असलेल्या मराठी भाषेमध्ये लाखो मराठी भाषिक आपले विचार व्यक्त करण्यासाठी या प्लॅटफॉर्मशी जोडले गेले आहेत. सर्वसामान्य लोकांसोबतच विविध क्षेत्रातील नामवंत लोक, नेते, विचारवंत मंडळी मराठी माणसांशी मायबोली मराठीतून संवाद साधत आहेत.

या प्लॅटफॉर्मवर दररोज अनेक मराठी रसिक राजकारण, अर्थकारण, सामाजिक प्रश्न, क्रीडा, करमणूक, साहित्य आणि ताज्या घडामोडींवर चर्चा करीत आपले विचार व्यक्त करतात आणि इतरांच्या विचारांचा आदर करतात.

मराठी प्रेमींना एकत्र आणत विविध विषयांवर संवाद घडवण्याच्या हेतूने कू मराठी स्वातंत्र्य दिन विशेष परिसंवादाचे आयोजन करीत आहे.

पहा व्हिडीओ : प्रयत्न करणाऱ्यांना यश मिळतंच

Back to top button