Starred Message : व्हॉट्सअ‍ॅपची ‘ही’ ट्रिक वापरा अन् महत्वाचे चॅट सेव्ह करा | पुढारी

Starred Message : व्हॉट्सअ‍ॅपची 'ही' ट्रिक वापरा अन् महत्वाचे चॅट सेव्ह करा

पुढारी ऑनलाईन डेस्क : व्हॉट्सअ‍ॅप युजर्स मोठ्या प्रमाणात आहे. त्याचं महत्वाचं खूप वाढलेलं आहे. चॅटिंग, फोटो, व्हिडीओ काॅल, व्हाईस काॅल, अशा अनेक सुविधा आपल्याला व्हॉट्सअ‍ॅपकडून मिळतात. व्हॉट्सअ‍ॅप Starred Message हादेखील ऑप्शन महत्वाचा आहे. ते कसं वापरतात, जाणून घेऊ या…

व्हॉट्सअ‍ॅपच्या अनेक ट्रिक्स आहेत, त्यातील चॅटिंगसंदर्भातील महत्वाची ट्रिक आज आपण पहाणार आहोत. आपल्या व्हॉट्सअ‍ॅपमध्ये अनेक महत्वाचे मॅसेज येत असतात. त्यामध्ये महत्वाचा संवाद झालेला असतो.

महत्वाचं चॅट आपल्याला अनेक दिवसांनंतर शोधायचं झालं की, खूप मागे जावं लागतं. अर्थात स्क्रोल करावं लागतं. त्यात वेळही जातो. पण, हे चॅट लगेच हवं असेल, तर व्हॉट्सअ‍ॅप Starred Message नावाचा ऑप्शन देते. त्यातून आपल्याला महत्वाचं चॅट लगेच सापडतं.

Starred Message

व्हॉट्सअ‍ॅपवर Starred Message कसं करणार?

पहिल्यांदा ज्या चॅटमध्ये महत्त्वाचा मेसेज आहे, जो तुम्हाला सेव्ह करायचा आहे तो ओपन करा.

नंतर महत्वाच्या मॅसेजला लाँग प्रेस करा. लक्षात घ्या, इथं एकाच वेळी एकाहून अधिक मेसेजही सिलेक्ट करता येऊ शकतात.

मेसेज सिलेक्ट झाला तर, चॅट विंडोमध्ये वरील बाजूस स्टार आयकॉन दिसेल. त्यावर टॅप करुन तुमचा महत्त्वाचा, सिलेक्ट केलेला मेसेज बुकमार्क होतो. त्यातूनच तुमचा तो महत्वाचा मेसेज सेव्ह होईल.

…असा पहा Starred Message!

पहिल्यांदा व्हॉट्सअ‍ॅप ओपन करा.

नंतर डाव्या बाजूला असलेल्या तीन डॉटवर क्लिक करा.

इथे Starred Message हा पर्याय तुम्हाला दिसेल.

त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही आधी सेव्ह केलेले, स्टार केलेले सर्व मेसेज दिसतील.

स्टार केलेले मेसेज अनस्टार करायचे असल्यास, पुन्हा त्या मेसेजवर सिलेक्ट करुन अनस्टार करता येईल.

पहा व्हिडीओ : गायी पाळणाऱ्या मुंग्यांची गोष्ट

Back to top button