Facebook Page : फेसबुकद्वारे आपला व्यवसाय कसा वाढवाल? | पुढारी

Facebook Page : फेसबुकद्वारे आपला व्यवसाय कसा वाढवाल?

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोरोना आणि लाॅकडाऊन यामुळे अनेक व्यावसायिकांचा जबरदस्त फटका बसला आहे. लाॅकडाऊन सोशल मीडिया जास्त अधोरेखित झाला आणि त्यातून लोक आपल्या व्यवसाय हळुहळु चालवू लागले. या सोशल मीडियावर व्यवसाय करणं सध्या फायद्याचं ठरतंय. इतकंच नाही तर उत्पादक थेट ग्राहकापर्यंत आणि ग्राहक थेट उत्पादकापर्यंत पोहोचू शकतो. या सोशल मीडियावर फेसबुक सध्या अग्रस्थानी आहे. चला तर, फेसबुक पेजवरून (Facebook Page) स्मार्ट बिझनेस कसा करायचा ते थोडक्यात पाहू…

  • सर्वात पहिल्यांदा व्यवसायिकाने स्वतःचे फेसबुक अकाऊंट काढायचं आहे.
  • त्यानंतर स्वतःच्या अकाऊंटद्वारे संबंधित व्यवसायाच्या नावाने फेसबुकचे पेज तयार करायचे.
  • फेसबुक पेजचे (Facebook Page) आकर्षक कव्हरपेज तयार करायचे. तसेच आपल्या व्यवसायाचा स्मार्ट लोगोदेखील बनवायचा आहे.
  • फेसबुकचे पेज तयार करताना व्यवसायाबद्दलची सविस्तर माहिती आणि संबंधित पत्ता भरायचा.
  • आकर्षक वाटेल असे फेसबुक पेज तयार केले. इतकंच करून थांबू नये. कारण, खरं चॅलेंज आहे ते पेज मेंटेन करणं. त्यामुळे रोज आपल्या प्राॅडक्टची माहिती देणारी पोस्ट पेज करावी.
  • लोकांची एंगेजमेंट वाढविण्यासाठी दिवसातून एक तरी कॅलेंडरनुसार जंयती, पुण्यतिथी, सण-सणवारे आणि इतर प्रेरणादायी गोष्टींचे ग्राफीक्स करून पोस्ट करावे. त्यातून आपल्या व्यवसायाची स्मार्टपणे जाहिरात करावी.
  • यातून लोक तुमच्या पेज लाईक करतीलच. त्याचबरोबर तुमचे लोगो असलेले ग्राफीक्सकार्ड इतर ठिकाणीही शेअर करतील. त्यातून अप्रत्यक्षपणे तुमच्या फेसबुक पेजचे फाॅलोअर्स वाढतील. तसेच व्यवसायाची अप्रत्यक्ष जाहिरात होईल.
  • आठवड्यातील ठराविक दिवशी विक्रीच्या पोस्ट कराव्यात. तिथे न चुकता संपर्क, स्थळ आणि ऑफर द्याव्यात.

facebook page

  • आता तुम्ही तुमच्या प्राॅडक्टची जाहिरात केली. पण, त्याला योग्य प्रतिसाद मिळावा, यासाठी फेसबुक मोठ्या प्रमाणात तुमच्या व्यवसायाशी संबंधिच अनेक ग्रूप असतात. त्यामध्ये जाॅईन होऊन तिथे विक्रीच्या पोस्ट शेअर कराव्यात.
  • या सर्वांत लोकांचा प्रतिसाद कसा मिळतो, लोकांना नेमकं काय खरेदी करायला आवडतं, या सर्वांचा अंदाज तुम्हाला यायला लागतो. त्यातून व्यवसाय कसा वाढवायाचा, याचं नियोजन करता येतं.
  • तुमच्या वैयक्तित फेसबुक अकाऊंटवरू जितके मित्र आहेत, त्या सर्वांना Invite पाठवा. त्यातूनही लाईक्स आणि फाॅलोअर्स वाढतात. त्याचबरोबर ज्या पोस्ट तुम्ही पेजवर टाकणार आहात, त्या पोस्ट तुमच्या फेसबुक प्रोफाईलवरदेखील शेअर करा.
  • पण, लक्षात ठेवा की फेसबुक पेजवर लाईक्स आणि फाॅलोअर्स जास्त असतील तर व्यवस्यास चांगला होईल किंवा विक्री जास्त होईल, असं अजिबात नाही. त्यासाठी तुम्ही टाकलेल्या पोस्टवर जास्तीतजास्त इंटरॅक्शन झालं पाहिजे. कारण, जेवढं इंटरॅक्शन जास्त तेवढी विक्री होण्याची शक्यता जास्त आहे.
  • तुम्ही केलेल्या पोस्टवर पाॅझिटिव्ह किंवा निगेटिव्ह काॅंमेट्स आल्यानंतर दोघांनाही सकारात्मक प्रतिसाद द्या. त्यांच्या प्रतिक्रियांना शक्य तितक्या लवकर रिप्लाॅय द्या.
  • समजा एखाद्याने तुम्हाला मॅसेजवरून संपर्क साधला, तर त्याच्या फोन नंबर शेअर करा. त्या ग्राहकाशी प्रत्यक्ष बोला आणि तुमच्या प्राॅडक्टविषयी सविस्तर सांगा.
  • फेसबुक पेज लाईक केलेल्यांचा वेगळा ग्रूप बनवा. त्याचबरोबर फेसबुक पेजला भेट देण्यासाठी विनंती करा.
  • आपल्या आप्तस्वकियांना, मित्रांना आणि ओळखीच्या लोकांना आपल्या फेसबुक पेजवर रिव्ह्यू लिहिण्यासाठी नक्की विनंती करा.

हे वाचलंत का?

Back to top button