WhatsApp चा ‘हा’ पर्याय वापरा आणि डोक्याचा ताप त्वरीत घालवा

WhatsApp चा 'हा' पर्याय वापरा आणि डोक्याचा ताप त्वरीत घालवा
WhatsApp चा 'हा' पर्याय वापरा आणि डोक्याचा ताप त्वरीत घालवा
Published on
Updated on

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : WhatsApp वर बहुतांशी मॅसेज, व्हिडीओ आणि फोटो हे विनाकामाचे फालतू असतात. ते आपण उघडूनही पहात नाही. हे फालतू मॅसेजस आपला मोबाईल इंटरनेट डेटा लवकर संपवतच नाहीत, तर मोबाईलचा स्पेसदेखील भरवतात. यापासून वाचण्यासाठी WhatsApp तर्फे अनेक मीडिया कंट्रोल दिलेले आहेत.

या मीडिया कंट्रोलमधून चॅटिंग आणि काॅलिंग करण्यात सहजता येते. हे करण्यासाठी व्हाॅट्सअपच्या सेटिंगमध्ये थोडा बदल करावा लागेल. त्यातून युजर्स व्हाॅट्सअपचे फोटो, व्हिडीओ आणि मल्टीमीडिया कंन्टेंटयावर कंट्रोल करू शकता. त्यासाठी युजर्सला WhatsApp मीडिया कंट्रोल बदल करावा लागला.

खरंतर, व्हाॅट्सअप युजर्सला ऑटो डाऊनलोडचा पर्याय देते, त्यामुळे व्हाॅट्सअपवर आलेले सर्व फोटो आणि व्हिडीओ ऑटोमेटिकली डाऊनलोड होतात. ते फोटो आपल्या मोबाईलमधील गॅलरीमध्ये स्टोअर होतात. जर एखादा व्यक्ती आपल्या व्हाॅट्सअपवर फालतूचे मॅसेजस पाठवत असेल.

अशा व्यक्तीची केवळ मीडिया फाईल बंद करण्याची इच्छा असेल आणि त्यापासून वाचायचं असेल, तर WhatsApp युजर्सना Media Visibility चा पर्याय उपलब्ध करून देते. चला पाहूया आपल्या व्हाॅट्सअपमध्ये  Media Visibility चा पर्याय कसं काम करतं ते…

ऑटो डाऊनलोड कसे बंद करावेत?

  • युजर्सने पहिल्यांना लेटेस्ट व्हर्जनचे WhatsApp डाऊनलोड करावा लागेल.
  • त्यानंतर WhatsApp ला ओपन करून वरील बाजूस टाॅममध्ये ३ डाॅट दिसतील.
  • त्यानंतर सेटिंगमध्ये उघडा. त्यानंतर स्टोअर उघडा.
  • त्यानंतर Media Auto Download सेक्शन ओपन करा.
  • त्यानंतर When using mobile data, When connected on Wi-Fi, When Roaming असे ३ पर्याय दिसतील.त्या तिन्ही सेक्शनला अनचेक करा.

मीडिया व्हिजिबिल्टीला कसे बंद कराल?

  • सर्वात पहिल्यांदा सेटिंगमध्ये क्लिक करा.
  • त्यानंतर Chats आणि Media Visibilty टर्न ऑफ करा.
  • त्यानंतर चॅट ओपन करून चॅटची मीडिया व्हिजिबिल्टी बंद करायची असेल, तर त्यालाही टर्न ऑफ करा.

पहा व्हिडीओ : मेन्स्ट्रुअल कप; समज-गैरसमज विषयावर विशेष चर्चा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news