Weather News : पुढील पाच दिवस राज्यात कडाक्याच्या थंडीची लाट | पुढारी

Weather News : पुढील पाच दिवस राज्यात कडाक्याच्या थंडीची लाट

पुढारी ऑनलाईन डेस्क : (Weather News) थंडी अजुनही संपलेली नाही. उत्तर पश्चिम आणि मध्य भारतात पुढचे पाच दिवस तापमानात तीन ते पाच डिग्री अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिल्लीत ‘कोल्ड डे’ सारखी परिस्थिती उद्भवू शकते. असा अंदाज वर्तवला आहे. यासह पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र च्या काही भागात थंडीची लाट पसरू शकते.

IMD ने सोमवारी सांगितले की, पुढच्या दोन किंवा तीन दिवसात पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र च्या काही भागात कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे. (Weather News)

थंडीच्या लाटेसह दाट धुके

पुढचे पाच दिवस पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र च्या काही भागात थंडीच्या लाटेची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अहवालानूसार, पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा, दिल्ली, बिहार, पश्चिम बंगाल, ओडिशा, आसाम, सिक्कीम, मेघालय आणि त्रिपुराच्या काही भागात येत्या दोन ते तीन दिवसांत दाट धुके पडण्याची शक्यता आहे. (Weather News)

थंड दिवस म्हणजे काय ?

IMD नुसार, जेव्हा किमान तापमान १० °C च्या खाली असते आणि कमाल तापमान सामान्य पेक्षा किमान ४.५ °C कमी असते तेव्हा ‘थंड दिवस’ येतो, तर ‘अत्यंत थंड दिवस’ म्हणजे जेव्हा कमाल तापमान सामान्यपेक्षा किमान 6.5 अंश पेक्षा कमी असते. (Weather News)

हेही वाचलत का?

Back to top button