पुणे शहरातील दोन वेगवेगळ्या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू | पुढारी

पुणे शहरातील दोन वेगवेगळ्या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू

पुणे : पुढारी वृत्तसेवा

शहरात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या दोन अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला. खराडी बायपास रस्त्यावरील झाडांना पाणी घालणाऱ्या टँकला धडकून एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. तर, भेकराईनगर येथे ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार झाला. याप्रकरणी चंदननगर व हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

तोतया कस्टम अधिकारी जाफर इराणीला पुणे पोलिसांकडून बेड्या

जगदीश गोकलराम जाट (वय १९, रा. साईनाथनगर, वडगाव शेरी) असे एका अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी राहूल थोरात (वय ३०, रा. लोणीकाळभोर) याने फिर्याद दिली आहे.

पुणे महापालिका निवडणूक : अजित पवार सक्रिय का झाले नाहीत?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडी बायपास रस्त्यावरील गंगा अल्टस सोसायटी समोर थोरात व टँकर चालक शनिवारी दुपारी डिव्हायडरवरील झाडांना पाणी घालत होते. त्यावेळी जाट हा मुंढव्याकडून खराडी बायपास चौकाकडे जात होता. गंगा अल्टस सोसायटी समोर तो पाण्याच्या टँकरला डाव्या बाजूच्या लोखंडी बंपरला पाठीमागून जोरात धडकला. यामध्ये तो गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विमानतळासाठी चाकण-खेडकरांच्या आशेला पुन्हा पंख

तसेच दुसरा अपघातात सासवड रस्त्यावरील भेराईनगर येथे भरधाव ट्रकची धडक बसून उमेश अशोक मोरे (वय २८, रा. मोरे वस्ती, वडकीनाला) याचा मृत्यू झाला. याप्रकरणी ट्रक चालक अंकुश रामजी शेळके (वय २६, रा. लोणंद, ता. खंडाळा) याला अटक करण्यात आली आहे. उमेश हा शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास कामावरून घरी येत होता. भेकराईनगर येथील विठ्ठल पेट्रोलपंपासमोर भरधाव ट्रकची त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरात धडक दिली. यामध्ये मोरे हा खाली पडून गंभीर जखमी झाला. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून ट्रक चालकास अटक केली. उपनिरीक्षक तृप्ती खळदे पुढील तपास करत आहेत.

इंदापूर : भिशीचालक नातेवाईकांच्या नावावरील मालमत्ता कशा करणार हस्तगत?

Back to top button